घरताज्या घडामोडीतापसी अनुराग प्रकरण: कशाला बोंबलता? २०१३मध्येपण आयकर धाडी पडल्या होत्या

तापसी अनुराग प्रकरण: कशाला बोंबलता? २०१३मध्येपण आयकर धाडी पडल्या होत्या

Subscribe

अशा चौकशी २०१३सालीही कलाकारांवर कारवाई करण्यात आल्या होत्या मात्र तेव्हा कोणी प्रश्न विचारले नाहीत. आताच का बोंब उठवली जातेय, असे सडेतोड उत्तर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिले.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली. या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले. आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर देशात अनेक राजकिय चर्चा झाल्या. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यावर भाष्य केले आहे. आमचे सरकार असताना अशा कारवाई केल्या त्यावर सर्वांनी टिका केली, अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र अशा चौकशी २०१३सालीही कलाकारांवर कारवाई करण्यात आल्या होत्या मात्र तेव्हा कोणी प्रश्न विचारले नाहीत. आताच का बोंब उठवली जातेय, असे सडेतोड उत्तर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिले.

‘या प्रकरणात मला कोणाचाही उल्लेख करायचा नाही आणि कोणाचेही नावही घ्यायचे नाही. पण जेव्हा आमचे सरकार असताना अशा कारवाई केल्या जातात तेव्हा त्यावर जाणूनबूजून सडकून टिका केली जाते. २०१३मध्ये अशाप्रकारे कारवाई करण्यात आल्या होत्या त्यावेळा याबाबत कोणताही मुद्दा उपस्थित केला नव्हता. तेव्हा या प्रकरणावर कोणीही काहीही बोलले नव्हते’, असे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी म्हटले आहे. निर्मला सितारामण यांनी महिला प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधला. आम्हाला देशाच्या हितासाठी जाणून घ्यायचे आहे की, कर चोरी केला जात आहे का? मी कोणत्याही विशिष्ट विषयावर भाष्य करायचे नाही मात्र मला असे विचारायचे आहे की काही चुकीचे होत असेल तर त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करु शकत नाही का? असेही निर्मला सितारामण म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

दोन मोठ्या सिनेमा प्रोडक्शन दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्यासह दोन मोठ्या कंपन्यावर छापे टाकण्यात आले. कलाकारांच्या मुंबई,पुण्याच्या घरावार आयकर विभागाने छापेमारी केली. या कलाकारांनी मोठ्या प्रमाणात कर भरला नसल्याने आयकर विभागाने ही छापेमारी केली.


हेही वाचा – आतापर्यंत ‘या’ बॉलिवूड कलाकारांवर केलीय आयकर विभागाने कारवाई

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -