घरमुंबईभाजपचे 'मिशन १३४'चे टार्गेट ; शिवसेनेच्या जागा रडारवर

भाजपचे ‘मिशन १३४’चे टार्गेट ; शिवसेनेच्या जागा रडारवर

Subscribe

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या सत्तेचा राजकीय फायदा घेऊन 'मिशन १३४' चे टार्गेट पूर्ण करायचे.

मुंबई: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले. शिवसेनेचे तत्कालीन नेते मंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले व भाजपसह शिंदे सरकार गठीत झाले. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या सत्तेचा राजकीय फायदा घेऊन ‘मिशन १३४’ चे टार्गेट पूर्ण करायचे. त्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून त्यांच्या जागा ‘येनकेन प्रकारे’ आपल्या ताब्यात घेण्याची रणनीती भाजपने आखली आखली असल्याचे सूत्रांकडून समजते.

हे ही वाचा – मुंबई महापालिकेकडून तरुण उद्योजकांद्वारे निर्मित वस्तू आणि उपकरणांना प्रोत्साहन

- Advertisement -

भाजपच्यव माजी नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील भाजप पक्ष कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी, भाजप आमदार मिहिर कोटेचा, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व पक्षनेते विनोद मिश्रा आदींनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रपती निवडणूक व मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असा राजकीय भूकंप झाला. सेना नेते व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ नाराज आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अवघ्या काही तासातच बंडखोरीचे शस्त्र उपसले. त्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, आसाम व गोवा येथील रणांगण वापरले. त्यांना त्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री व आताचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह केंद्रातील उच्च पदस्थ नेत्यांची अंतर्गत ‘मोठी रसद’ लाभली होती.

हे ही वाचा – सह्याद्री राईट्स फोरमची आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची पोलीस आयुक्तांना नोटीस

- Advertisement -

हे ही वाचा – नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

त्यातच त्यांच्या नशिबाने कायदाची त्यांना जवळजवळ चांगली साथ लाभली. त्यामुळे अखेर सत्तांतर झाले. सध्या महत्वपूर्ण राजकीय घटनांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
आता या सत्तेचाच वापर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुरेपूर करून सोन्याची अंडी देणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवायचा निर्धार भाजपच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
त्यासाठी प्रत्येक माजी नगरसेवकाने आपल्या मतदार संघात व आजूबाजूच्या मतदार संघात जास्तीत जास्त काम करावे व मेहनत घ्यायची तयारी करावी, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना दिल्याचे सूत्रांकडून समजते.
यावेळी, ओबीसी आरक्षणासंदर्भातही चर्चा झाली. जर महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू झाल्यास कोणते प्रभाग ओबीसी राखीव होतील, याचा अंदाज यावेळी व्यक्त करून त्या दिशेने पावले टाकण्याची रणनीती ठरवण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे दर महिन्याला माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा – मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत खासदारांच्या बैठकीला सुरूवात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -