घरमुंबईमुंबईत 2 वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, पहाटेपासून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी

मुंबईत 2 वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, पहाटेपासून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी

Subscribe

कोरोना महामारीनंतर मुंबईत तब्बल दोन वर्षांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी देखील उपस्थिती दर्शवली. या मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईकरांनी मोठा सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 55,000 स्पर्धक टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

ढोल ताशांच्या गजरात मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कडाक्याच्या थंडीतही स्पर्धकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

- Advertisement -

या मॅरेथॉन स्पर्धेला पोहचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आज पहाटे 3.45 वाजता बोरिवलीहून विशेष लोकल सोडली होती.

हाफ मॅरेथॉनला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान हाफ मॅरेथॉनच्या महिला विजेत्या (21 कि.मी) जाहीर झाले आहेत. यात पारूल चौधरी हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नंदिनी गुप्ता हिने दुसरा आणि पुनम सोनावणे तिसरी आली आहे. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष विजेत्यांमध्ये मुरली गावित याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर अंकित देसवाल दुसरा आणि दिपक कुंभार तिसरा क्रमांकाने जिंकला आहे.  टाटा समूहाकडून आयोजित मुंबई मॅरेथॉनमध्ये माहीम इथे हाफ मॅरेथॉन पोलीस कपमध्ये 14 हजार मुंबईकर सहभागी झाले आहेत.

दरम्यान मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिस तसेच आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची सुविधा आणि मेडिकल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासह स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मुंबईतील काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. संबंधित मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. आज पहाटे तीन ते 1 वाजून 15 मिनीटांपर्यंत वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत.


भाजपची ढील तर मविआची घसटी निवडणुकीत मोठा ‘पेच’

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -