घरताज्या घडामोडी१ फेब्रुवारी पासून मुंबईतील टॅक्सीचा लूक बदलणार

१ फेब्रुवारी पासून मुंबईतील टॅक्सीचा लूक बदलणार

Subscribe

विदेशातील टॅक्सी सेवेप्रमाणे आता १ फेब्रुवारी २०२० पासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावरही तीन रंगाचे दिवे लावण्यात येणार आहेत. बुधवारी दिवे उत्पादकांची बैठक परिवहन आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीत चार उत्पादकांनी दिवे लावण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. आता १५ जानेवारी २०२० ला टॅक्सी संघटनेशी चर्चा करुन या नियमांची अंमलबजावनी करण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरात टॅक्सींची संख्या सरासरी ४५ हजार तर रिक्षाची सरासरी संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. पुर्वी मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. मीटर अप असल्यावर टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, असे संकेत पाळले जायचे. मात्र कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर भाडे नाकारल्यास रिक्षा-टॅक्सी चालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येते. कधी कधी तर टॅक्सी आणि रिक्षा चालक घरी जात असताना भाडे स्वीकारत नाहीत. अशा टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आणि टॅक्सी-रिक्षा चालकांच्या समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर तीन रंगाचे दिवे लावण्याचा निर्णय परिवहण विभागाने घेतला आहे. यासंबधी सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. यांची अंमलबजावनी १ फेब्रुवारी २०२० पासून होणार आहे.

टॅक्सी युनियनबरोबर होणार चर्चा

परिवहण विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार दिवे तयार करणार्‍या कंपनीशी परिवहण विभागाची चर्चा झाली आहे. मात्र १५ जानेवारी २०२० ला परिवहण विभाग यासंबंधी टॅक्सी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत दिव्यांचे महत्व पटवून देण्यात येईल. त्यानंतर यांची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. टॅक्सी चालक मालक संघटनानी यावर सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारी दिवे उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीत चार उत्पादकांनी दिवे लावण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. परिणामी, दिव्यांचे दर ठरवण्यासाठी उत्पादकांसह टॅक्सी संघटनांना १५ जानेवारीला बोलावल्यात आले आहे. – शेखर चन्ने, परिवहन आयुक्त

- Advertisement -

असे असणार दिवे आणि त्यांच्या अर्थ

हिरवा – हिरवा दिवा सुरू असल्यास प्रवाशांना ती प्रवासासाठी उपलब्ध असेल.

लाल – लाल दिवा सुरू असल्यास टॅक्सीत प्रवासी प्रवास करत असेल.

पांढरा – पांढरा दिवा सुरू असल्यास सार्वजनिक प्रवासासाठी टॅक्सी उपलब्ध नसेल किंवा खासगी वापरात असेल.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -