प्रवाशांकडून टीसीला बेदम मारहाण

पश्चिम रेल्वे मार्गांवर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणारी फ्लाईंग रानी एक्स्प्रेसमध्ये दोन प्रवाशांनी रेल्वेचा टिसीला बेदम मारहान करण्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे. या घटनेत टीसी जखमी झाला असून या दोन्ही आरोपीना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.

प्लाईंग राणी एक्स्प्रेसमध्ये घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार प्लाईंग राणी एक्स्प्रेस अहमदाबादवरुन मुंबईकडे येत होती. तेव्हा सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी डाहणू रोड रेल्वे स्थानकांवर आली. तेव्हा चिन्मय जगन्नाथ बारी आणि धीरेंद्र ईश्वर पाटील हे दोन प्रवासी रेल्वे गाडीत चढले. यादरम्यान प्लाईंग राणी एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या टिसी अर्जुंन सिंग यांनी त्यांना तिकीटची विचारणा केली असता त्यांनी एमएसटी पास दाखवली. त्यानंतर टीसी आणि प्रवाशांचा दोघांत वाद निर्माण झाला. बघता बघता केळवे रोड स्थानकांदरम्यान यादोन प्रवाशांनी अर्जुंन सिंगवर हल्ला चढवला. ज्यात टीसी जख्मी झाले. त्यानंतर अर्जुंन सिंगने यांची तक्रार पोलीसांकडे केली. तेव्हा पोलीसांनी बोरीवली रेल्वे स्थानकांत यादोन्ही आरोपी प्रवाशांना अटक करण्यात आली. मात्र त्यांच्यावर गुन्हा नोदविण्यात आलेल्या नाही.कारण बोरीवली लोहमार्ग पोलीसांची हद येत नव्हती. त्यानंतर या दोन आरोपीना पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात घेउन गेले. तिथे त्यांच्या गुन्हा नोदविण्यात आलेल्या आहे. तसेच पालघर पोलीसांकडे यादोन्ही आरोपीला सपुर्द करण्यात आले आहे. पालघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. चिन्मय जगन्नाथ बारी आणि धीरेंद्र ईश्वर पाटील वांंद्रेचा एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे.