Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई शिक्षक ते मुंबईचे महापौर.. जाणून घ्या, कट्टर शिवसैनिक विश्वनाथ महाडेश्वरांचा प्रवास

शिक्षक ते मुंबईचे महापौर.. जाणून घ्या, कट्टर शिवसैनिक विश्वनाथ महाडेश्वरांचा प्रवास

Subscribe

विश्वनाथ महाडेश्वर यांचा शिक्षक ते मुंबईचे महापौर हा प्रवास थक्क करणारा होता. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून स्वतःची अशी एक वेगळी निर्माण केलेली होती.

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटामध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा फटका देखील बसला आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2017 ते 2019 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून कारभार सांभाळला होता. त्याशिवाय ते शिक्षण समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. शाळेत शिक्षक म्हणून काम केलेल्या महाडेश्वर यांची ओळख ‘सर’ म्हणून होती. पण त्यांचा शिक्षक ते मुंबईचे महापौर हा प्रवास थक्क करणारा होता. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून स्वतःची अशी एक वेगळी निर्माण केलेली होती. शिक्षक असलेले महाडेश्वर यांनी त्यांच्या संयमी वृत्तीने राजकारणात प्रगती केली आणि ते 2017 ला मुंबईचे महापौर बनले.

हेही वाचा – शरद पवारांची चौफेर फटकेबाजी; शिंदे, राऊतांसह पृथ्वीराज चव्हाणांचाही घेतला समाचार

- Advertisement -

विश्वनाथ महाडेश्वर हे घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील राजे शिवाजी हायस्कूलमध्ये प्राध्यापक होते. 1992 च्या दंगलीमध्ये ते शाखाप्रमुख पदी असल्याने विश्वनाथ महाडेश्वर यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. ज्यानंतर ते काम करत असलेल्या राजे शिवाजी हायस्कूल पंतनगर घाटकोपर शैक्षणिक संस्थेकडून शिस्तभंगाची कारवाई करत कामावरून काढून टाकले.

शिवसैनिक झाल्यानंतरही त्यांनी प्राध्यापक म्हणून आपले काम पुढे सुरूच ठेवले. विश्वनाथ महाडेश्वरांनी 1993 साली पहिल्यांदा आपल्या विभागात स्वतः क्लास घेण्यास सुरुवात केली होती. विभागातील परिस्थिती पाहता त्यांनी राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज सांताक्रुजमध्ये सुरू हा क्लास सुरू केला. त्यांच्या विभागामध्ये अनेक गरीब विद्यार्थी वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी भाषिक शाळेची प्रबोधन शिक्षण संस्था सुरू करत सिक्रेट माईन हायस्कूलची स्थापना केली. एकीकडे आपली प्राध्यापकाची जबाबदारी दुसरीकडे शिवसेनेने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या ते कायमचं पार पाडत राहिले.

- Advertisement -

विश्वनाथ महाडेश्वर हे एकमेव राजकारणी असतील, जे कायमचं मराठी भाषेमध्ये संवाद साधायचे. महापौर असताना महाडेश्वर हे दैनंदिन जीवनात मराठी भाषेच्या वापरासाठी कायम आग्रही राहिलेले पाहायला मिळाले. महापौर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्वनाथ महाडेश्वर फक्त मराठी भाषेतच संवाद साधायचे. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांना प्रोत्साहन देणे आणि पालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढावा, यासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले.

- Advertisment -