घरमुंबईशिक्षकांनाही मिळणार कोरोना लस; फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून समावेश करण्याच्या सूचना

शिक्षकांनाही मिळणार कोरोना लस; फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून समावेश करण्याच्या सूचना

Subscribe

फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महापालिकेतील शिक्षकांनाही कोरोना लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच झालेल्या पालिकेच्या झालेल्या बैठकीत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सफाई कामगार यांना लस देण्यास संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य कर्मचार्‍यांपाठोपाठ आता फ्रंट लाईन वर्कर्संनाही कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पोलीस, पालिका कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र आता फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महापालिकेतील शिक्षकांनाही कोरोना लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच झालेल्या पालिकेच्या झालेल्या बैठकीत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सफाई कामगार यांना लस देण्यास संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकही घरातून वर्ग घेत होते. मात्र मुंबई महापालिकेच्या शाळेतील शिक्षक हे कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांची माहिती घेणे, कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे, कोरोना सेंटरवर माहिती संकलित करणे, झोपडपट्टीमध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणे, शाळेतील विद्यार्थ्यांना धान्य, पुस्तके, वह्या यांचे वितरण करणे आदी कामे सुरुवातीपासून करत होते. ही कामे कोरोना काळातील महत्त्वपूर्ण कामे होती. ही कामे करण्यासाठी शिक्षक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपली कामे चोखपणे बजावत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पालिकेच्या शाळांमधील शिक्षक हे विविध कामांसाठी शाळांमध्ये दररोज येत आहेत. काही शिक्षक शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्गही घेत आहेत. त्यामुळे महापालिकेतील शिक्षक हे सुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स ठरत असल्याने त्यांनाही कोरोना लस मिळणे अपेक्षित आहे. पालिका शाळेतील शिक्षकांप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी यांनी सुद्धा आपली कामे चोख बजावली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांसह कर्मचार्‍यांचाही फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून त्यांनाही लवकरच लस देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍याने दिली. यासंदर्भात नुकतीच पालिकेच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीमध्ये महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सफाई कामगार यांना कोरोना लस देण्यासंदर्भातील निर्देश शिक्षणाधिकार्‍यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कंत्राटी कर्मचार्‍यांनाही मिळणार लस

पालिकेच्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष परिसरामध्ये जाऊन काम केले असले तरी यावेळी शाळा उघडणे, त्यांची साफसफाई करण्यासाठी नियुक्त केलेले कंत्राटी कर्मचारी हे सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून शाळेत येत होते. त्यामुळे पालिकेच्या शाळेतील कंत्राटी कर्मचार्‍यांचाही फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश करून त्यांनाही लस देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -