घरमुंबईपश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा; तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटला जाणारी वाहतूक उशिराने

पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा; तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटला जाणारी वाहतूक उशिराने

Subscribe

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या मुसळधार पावसाने मुंबईत लोकल ठप्प झाली आहे. एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या जलद आणि धीम्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावणार आहे. यामुळे बाकीच्या रेल्वे स्थानकावरील वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल आज दुपारी 12.55 वाजता मीरा रोड ते दहिसरदरम्यान बंद पडली. बराच वेळ लोकल जागेवरून पुढे न गेल्याने नेमक काय झाल हे प्रवाशांना समजू शकले नाही. अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून रुळावरून चालत स्थानक गाठले. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अचानक लोकल सेवा बंद झाल्याने प्रवाशांना स्थानकापर्यंत अडचणींचा सामना करावा लागला.

- Advertisement -

यावेळी या मार्गावरील लोकल चर्चगेट दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. याचा परिणाम धीम्या लोकलच्या वेळापत्रकावर झाला आहे. लोकलचा हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी अर्धा तासांचा वेळ लागला,यामुळे डहाणू आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद रेल्व मार्गावरील धीम्या लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामुळे लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे.

आसनगानदरम्यान लोकल सेवाही विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावरील आसनगावदरम्यानही लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. एलटीटीहून छापराला जाणारी गाडी दुापारी 12.45 च्या सुमारास इंजिनमध्ये बिघाड झाल्याने थांबली. ही बिघाड दुरुस्त करण्यासाठी एक तासांचा वेळ गेला त्यानंतर गाडी पुढे रवाना झाली. त्यामुळे आसनगाव डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरु आहे. याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.


केंद्र सरकारकडून ट्विटर इंडियाला शेवटचा अल्टिमेटम, नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -