घरताज्या घडामोडीछापा टाकायला गेलेल्या NCB पथकावर ड्रग्ज पेडलरने सोडले कुत्रे

छापा टाकायला गेलेल्या NCB पथकावर ड्रग्ज पेडलरने सोडले कुत्रे

Subscribe

ड्रग्ज पेडलरकडून गांजासह अडीच लाख रोख केली जप्त

मुंबईमध्ये ड्रग्ज पेडलरवरती छापा टाकणाऱ्या एनसीबी (NCB)च्या पथकावर कुत्रे सोडल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याची समोर आली आहे. विभागीय संचालक समीर वानखडे यांच्या पथकावर कुत्रे सोडून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न १९ वर्षांच्या ड्रग्ज पेडरलने केला. पण पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज आणि रोख जप्त केली आहे. बांद्रा भागात हा छापा टाकला असून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली आहे.

- Advertisement -

ड्रग्ज तस्करी करणाऱ्या या आरोपीचे नाव आयान शेख असे आहे. हा १९ वर्षीय आरोपी आयान शेख अंधेरी, खार, वर्सोवा, बांद्रा येथे ड्रग्ज सप्लाय करतो, अशी माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे एनसीबीची टीम त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेली होती. पण एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पाहताच आरोपीने पाळलेले दोन कुत्रे त्यांच्या अंगावर सोडले. त्यांच्या कारवाईमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील एनसीबीने कारवाई केली. यावेळी आरोपीने कम्प्युटरच्या सीपीयुमध्ये गांजा लपवल्याचे समोर आले. या कारवाईमध्ये गांजासह अडीच लाख रोख जप्त केली असून आरोपी आयान शेख याला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, आरोपी बॉलिवूडच्या कलाकारांना देखील ड्रग्ज सप्लाय करत होता. त्यामुळे आता त्याला चार दिवसांसाठी एनसीबी कोठडीत ठेवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आज एक वर्ष पूर्ण झाली आहे. या लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक तरुण बेरोजगार झाले. यापैकी एक आरोपी आयान शेख होता. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यामुळे त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. उत्पन्नाचे साधन बंद होऊन तो बेरोजगार झाला होता. त्यामुळे तो ड्रग्ज व्यवसायकडे वळाला आणि ड्रग्ज सप्लाय करू लागला, अशी माहिती आरोपीने एनसीबीला दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकलबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -