घरताज्या घडामोडीतेजस ठाकरेंना मुंबईत सापडली दुर्मिळ अंध प्रजाती; नाव ठेवलं...

तेजस ठाकरेंना मुंबईत सापडली दुर्मिळ अंध प्रजाती; नाव ठेवलं…

Subscribe

 तेजस ठाकरे यांचा वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी मुंबईत नवी दुर्मिळ प्रजाती शोधून काढली आहे.ही प्रजाती त्यांनी ५ वर्षापूर्वी गोळा केली होती आणि ह्यावर संपूर्ण महामारीच्या काळात अभ्यास करण्यात आला. हा संशोधनाचा प्रवास खूप खडतर होता, अखेर हे संशोधन प्रकाशात आले आहे. ‘Rakthamichtys Mumba’ ही दुर्मिळ प्रजाती असून, हा जीव विशेष पुर्णत: आंधळा आहे. ही प्रजाती मुंबईत सापडल्यामुळे मुंबा देवीच्या नावावरुन या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. तेजस ठाकरे यांनी त्यांचे सहकारी प्रवीणराज जयसिम्हन,अनिल मोहपात्रा, अन्नम-पवन कुमार यांच्यासह या प्रजातीचा शोध लावला आहे. ही प्रजाती पश्चिम घाट आणि महाराष्ट्रातील जैवविविधतेत नव्याने भर पडली आहे.

मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, माझ्या हातून एक उल्लेखनीय शोध लागला आहे. यांसारख्या छोट्या प्रजातींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती पावले उचलून या जीवांचे संरक्षण केले पाहिजे,असे तेजस ठाकरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

‘या’ दुर्मिळ प्रजातींचाही शोध लावला

तेजस ठाकरे यांचा वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. अनेक मासे,खेकडे आणि पालीच्या दुर्मिळ प्रजातीचाही शोध लावला.सप्टेंबर 2020 मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं होतं.


हे ही वाचा – रायगडात गिधाडांची पिल्ले आकाशात झेपावणार

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -