मुंबई तापली! आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची नोंद, पाहा आकडेवारी

मुंबईत आज सांताक्रूझ वेधशाळेने हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च कमाल तापमान नोंदवले. सांताक्रूझ वेधशाळेत 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, कुलाबा वेधशाळेत 35.8 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली आहे.

abnormal temperature

मुंबईत आज सांताक्रूझ वेधशाळेने हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च कमाल तापमान नोंदवले. सांताक्रूझ वेधशाळेत 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, कुलाबा वेधशाळेत 35.8 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. (Temperature Increased In Mumbai IMD Maharashtra IMD predict rain in Marathwada Madhya Maharashtra)

हवामाना विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत तापामानाने 39 अंशाचा आकडा ओलांडला असून, देशातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. तसेच, 11 ते 13 मार्चपासून देशातील तापमानात काही बदलांची नोंद केली जाणार आहे. मुंबई शहर आणि परिसरात दिवसभरात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून काही भागांमध्ये वीजांचा कडकडाटही होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये ही परिस्थिती असताना विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हरभरा, गहू पक्वका अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ मार्चपासून पावसाची शक्यता आहे. हे वातावरण १७ मार्चपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – जुन्या 500, 1000 नोटांच्या ‘त्या’ पोस्टबद्दल पीआयबीचे स्पष्टीकरण; म्हणाले…