पालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी तात्पुरती भरती, असा करा अर्ज

BJP Demand for action shivsena tunnel laundry scam in municipal hospital
पालिका रुग्णालयात टनेल लाँड्रीच्या नावाखाली भ्रष्टाचार; भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबई महापालिका आरोग्य खात्याअंतर्गत रुग्णालयांसाठी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी ४ जागांवर तात्पुरती भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना ७२ हजार रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कस्तुरबा, कूपर आदी रुग्णालयात सध्या डॉक्टर, नर्स, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांची काही पदे रिक्त आहेत. याचा रुग्णालयातील रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदांवरून काही कालावधीपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत आणि पालिका सभेत अनेकदा तीव्र पडसादही उमटले होते. म्हणून आता पालिकेने सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदावरील ४ जागा तात्पुरत्या सेवेसाठी भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या पदासाठी अर्जदार उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्जदाराचे वय ६२ पर्यंत आणि एमबीबीएस डिग्रीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून अथवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला किमान पदाचा अनुभव असणे आणि उमेदवार हा राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. पालिकेच्या सर्व अटी आणि शर्थी त्या उमेदवाराला मान्य करणे बंधनकारक असेल. मात्र अर्जदाराने आपला अर्ज अचूक माहिती भरून प्रशासकीय वैद्यकीय अधिकक्षक कस्तुरबा रूग्णालय या ठिकाणी १३ एप्रिलपर्यंत पाठवावा.


हेही वाचा – Mumbai Metro: गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई मेट्रोच्या दोन लाईन होणार सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन