Eco friendly bappa Competition
घर मुंबई कुर्ल्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहाणार बंद, 'या' भागात ४ मार्चपासून पाणीबाणी

कुर्ल्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहाणार बंद, ‘या’ भागात ४ मार्चपासून पाणीबाणी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या ‘एल’ विभागामधील खैरानी रोडखाली असणा-या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर या दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम करणे आवश्यक झाले आहे. मात्र, या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याने व सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल.यास्तव, महापालिकेच्या जल अभियंता खात्याने याबाबत सकारात्मक विचार करुन सदर काम हे टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सदर काम हे टप्प्या-टप्प्याने १० दिवसात अर्थात सलग १० शनिवारी करण्यात येणार आहे.

मुंबईः कुर्ला विभागातील खैरानी रोड परिसरात जल वाहिनीच्या सक्षमीकरणासाठी व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पालिका जल अभियंता खाते ४ मार्चपासून जलवाहिनीचे काम हाती घेणार आहे. सलग दहा दिवस काम करावे लागणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेता पालिकेने दर शनिवारी याप्रमाणे सलग दहा शनिवारी टप्प्या टप्पायाने काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशीच आवश्यक पाणीसाठा करून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘एल’ विभागामधील खैरानी रोडखाली असणा-या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर या दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम करणे आवश्यक झाले आहे. मात्र, या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याने व सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल.यास्तव, महापालिकेच्या जल अभियंता खात्याने याबाबत सकारात्मक विचार करुन सदर काम हे टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सदर काम हे टप्प्या-टप्प्याने १० दिवसात अर्थात सलग १० शनिवारी करण्यात येणार आहे. यामुळे शनिवार ४ मार्च ते शनिवार ६ मे २०२३ या कालावधीदरम्यान प्रत्येक शनिवारी ‘एल’ कुर्ला विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

या परिसरातील नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून व काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून दर रविवारी येणारे पाणी हे गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे. ‘एल’ विभागातील खैरानी रोडखाली असणा-या १२०० मिलीमीटर व्यासाच्या व ८०० मीटर लांबीच्या जल वाहिनीचे सक्षमीकरण लवकरात लवकर करणे आवश्यक झाले आहे. या अंतर्गत सदर जल वाहिनीच्या अंतर्गत भागात ‘क्युअर्ड इन प्लेस्ड पाईप’ या पद्धतीने जल वाहिनीचे मजबुतीकरणाचे काम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी सलग १० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. मात्र, सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी व नागरिकांची गैरसोय टाळण्याच हेतुने सदर काम टप्प्या-टप्प्यामध्ये १० दिवसात करण्यात येणार आहे.

या विभागात असेल पाणी पुरवठा बंद
‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरांमध्ये शनिवार ४ मार्च पासून ते शनिवार ६ मे २०२३ पर्यंत सलग १० शनिवार पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल.

- Advertisement -

‘एल’ विभागात तारीखनिहाय पाणीपुरवठा असणार बंद

४ मार्च, ११ मार्च, १८ मार्च , २५ मार्च, १ एप्रिल, ८ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे या दिवशी पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल, असे माळवदे यांनी कळविले आहे.

- Advertisment -