घरदेश-विदेश३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत

३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत

Subscribe

- देशातील शास्त्रज्ञांची पंतप्रधान मोदींना माहिती

देशातील शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत. देशात करोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. करोनाविरोधातील लढाईत भारतात लस विकसित करण्यात येत आहे, त्याच्या संशोधनाची प्रगती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. यावेळी करोनाविरोधातील लसीवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही देशात करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे आता करोनाला रोखण्यासाठी विकसित होत असलेल्या लसीकडेच आशेने पाहिले जात आहे. देशात करोनावरील ३० विविध लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात असल्याचे शास्रज्ञांनी पंतप्रधानांना सांगितले.

- Advertisement -

तसेच काही लसी प्रयोगासाठी वापरण्याच्या टप्प्यावर आल्या असल्याची माहितीही या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. याबाबत पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून बैठक संपल्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठीच्या प्राथमिक टप्प्यात भारतीय कंपन्या काम करत आहेत. भारतामध्ये करोनावर लस विकसित करण्यासाठी तीन वेगवेगळे दृष्टीकोन समोर ठेवून काम केले जात आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

त्यातील पहिली बाब म्हणजे सध्या वापरात असलेल्या औषधांमधून करोनावर प्रभावी ठरू शकेल, अशा औषधावर अभ्यास केला जात आहे. सद्यस्थितीत अशा चार औषधांचे याबाबत संशोधन आणि परीक्षण केले जात आहे. यातील दुसर्‍या प्रकारात एक नवे औषध आणि मॉलिक्युल्स विकसित करण्यार भर देण्यात येत आहे. तर तिसर्‍या प्रकारामध्ये विषाणूविरोधी गुण तपासण्यासाठी काही अर्क आणि उत्पादनांची तपासणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -