घरमुंबई"५६ इंचांची छाती काय ते..."; ठाकरे गटाकडून भाजपवर घणाघात

“५६ इंचांची छाती काय ते…”; ठाकरे गटाकडून भाजपवर घणाघात

Subscribe

जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य आता राजकीय वर्तुळातही गाजू लागलंय. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट केलंय.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर सध्या पाकिस्तानात दिलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. पण जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य आता राजकीय वर्तुळातही गाजू लागलंय. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट केलंय.

गीतकार जावेद अख्तर यांनी २६/११ हल्ल्यावरून पाकिस्तानला टार्गेट केलं. ‘पाकिस्तानातील सामान्य लोकांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. पाकिस्तानी लोक पाकिस्तानी सैन्यापेक्षा खूप वेगळे आहेत.’ जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयोजित ‘फैज फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खचाखच भरलेल्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तान सरकारवर सडकून टीका केली.

- Advertisement -

26/11 हल्ल्याचे सूत्रधार तुमच्या पाकीस्तानात खुलेआम फिरत आहेत, असं जावेद अख्तर म्हणाले होते. तसंच “नुसरत फतेह अली खान असो किंवा गुलाम अली असोत आपला देश पाकिस्तानच्या कलाकारांचा आदर करतो. भारतीयांनी सर्वांना खूप प्रेम दिले आहे, त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. पण लता मंगेशकर यांना कधीच पाकिस्तानात बोलावण्यात आले नाही, ” असं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलंय.

Samana-On-Javed-Akhtar-Statement
जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट केलंय.

जावेद अख्तर यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाने भाजप आणि स्वयंसेवक संघावर टीका केलीय. सामनामधील अग्रलेखातून त्यांनी हे टीकास्त्र सोडलंय. “कधीकाळी लाहोरवरही तिरंगा फडकत होताच. शायर फैज अहमद फैज यांच्या लाहोरमधील स्मृती समारोहाच्या निमित्ताने जावेद अख्तर महोदयांनी तो पुन्हा फडकवला. संघ परिवारातील, भाजपवाल्यांतील एखाद्याने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे चढाई करण्याची हिंमत दाखवावी. फुकटचे बुडबुडे इकडे बसून फोडू नयेत. ५६ इंचांची छाती काय ते जावेद अख्तर यांनी दाखवले. त्यांचे खास अभिनंदन!”, असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -