घर मुंबई नितेश राणेंच्या धमकीवर संजय राऊत म्हणाले, "...त्यावेळी यांनी स्वतःला कोंडून घेतले होते"

नितेश राणेंच्या धमकीवर संजय राऊत म्हणाले, “…त्यावेळी यांनी स्वतःला कोंडून घेतले होते”

Subscribe

आमदार नितेश राणे यांनी तर “संजय राऊतांची सुरक्षा १० मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत”, अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली. त्यावर आता संजय राऊतांची बोचरी प्रतिक्रिया आली आहे.

विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झालेले पहायला मिळाले. शिवसेना व भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आमदार नितेश राणे यांनी तर “संजय राऊतांची सुरक्षा १० मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत”, अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली. त्यावर आता संजय राऊतांची बोचरी प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर आता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. यावेळी संजय राऊतांनी नितेश राणेंना चॅलेंज देत हल्लाबोल केलाय. “नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं मला धमकी देतंय, की विधानसभेत माझी सुरक्षा काढा, अरे तुझं सरकार आहे काढ ना सिक्युरिटी असं म्हणून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.”, असं संजय राऊत यावेळी म्हटले. यापुढे बोलताना संजय राऊतांनी नितेश राणेंना टोला लगावला. कोकणात नितेश राणे असताना ज्यावेळी शिवसैनिक कोकणात गेले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी स्वतःला कोंडून घेतले होते, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

यावेळी बोलताना संजय राऊतांनी नितेश राणेंवर आरोप देखील केलेत. नितेश राणेंच्या बोगस कंपन्या असून शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणाऱ्या यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असं खोचक सल्ला देखील संजय राऊतांनी दिला. खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना ईडी आणि सीबीआयच्या नोटीस मिळाल्यानंतर यांनी लगेच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या प्रमाणेच मलाही या नोटीस आल्या मात्र मी घाबरलो नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले. या नेत्यांना नोटीस मिळाल्या आणि त्यांना शिवसेनेतून पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे त्यांना निमित्तच मिळालं असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -