घरमुंबईThackeray VS Thackeray : आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही; राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे...

Thackeray VS Thackeray : आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही; राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Subscribe

या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली. याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करत  शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली. याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करत  शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Thackeray VS Thackeray We dont accept dowry Thackeray groups response to Raj Thackerays criticism)

शिवसेना ठाकरे गटाने म्हटले की, महाराष्ट्र हा लेचापेच्याचा नाही, तर महाराष्ट्र हा शुरांचा, मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश आहे. आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राची तीच ओळख ठेवायची आहे. कणखर देशा, राखट देशा, दगडांच्या देशा आणि आता जे चाललं आहे, गुंडांच्या, लाचारांच्या आणि नामर्दांच्या देशा ही आपल्या महाराष्ट्राची ओळख नाही आहे. समोर कितीही बलाढ्य शत्रू असला तरी आपलं स्वयत्व आहे, स्वाभिमान, धर्माभिमान, देशाभिमान आहे, तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा. आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही. आमच्या मातीचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणाने जपायचा आहे. त्यासाठी ठाकरेंची मशाल हातात घ्यावीच लागणार, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray at Shivaji park : नरेंद्र मोदींना पाठिंबा पण…; राज ठाकरेंनी जाहीर केला लोकसभेनंतरचा अजेंडा

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे?

दरम्यान, शिवाजी येथील मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. कारण त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी नरेंद्र मोदी यांना मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाही तर त्यांच्या काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : बारामतीत पवारांनाच निवडून आणा; अजित दादांच्या आवाहनाने पिकला हशा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -