घरट्रेंडिंगमुंबईत मलेरियाचे थैमान; ऑगस्टमध्ये सापडले १ हजार १३७ रुग्ण

मुंबईत मलेरियाचे थैमान; ऑगस्टमध्ये सापडले १ हजार १३७ रुग्ण

Subscribe

मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये मलेरियाचे १ हजार १३७ रुग्ण सापडले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही अंशी स्थिर असताना मुंबईमध्ये आता मलेरियाने थैमान घातले आहे. मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये मलेरियाचे १ हजार १३७ रुग्ण सापडले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेसमोर मलेरियाचे आव्हान निर्माण झाले आहे.

मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये पावासाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे आता मुंबईमध्ये मलेरियाचे रुग्ण वाढताना दिसू लागले आहेत. मुंबईमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत १ हजार १३७ मलेरियाचे रुग्ण सापडले. गतवर्षी ऑगस्टमध्ये हाच आकडा ८२४ इतकी होती. मलेरियाचे रुग्ण मुंबईत वाढत असताना गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये अन्य आजारांनी फारसे डोके वर काढले नाही. मलेरियापाठोपाठ मुंबईमध्ये लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत डेंग्यूचे ४९ रुग्ण सापडले होते. यंदा ४५ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे गॅस्ट्रोचे ५३, हेपेटाईटिस आणि डेंग्यू अनुक्रमे १० आणि एच१एन१ चा अवघा एक रुग्ण सापडला आहे. मलेरिया आणि लेप्टो डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

पालिका घेत असलेली काळजी

मलेरियाच्या रुग्णांची वाढ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून हॉस्पिटल, डिस्पेन्सरी आणि हेल्थ पोस्टवर रक्त चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण शोधण्यासाठी पालिकेकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्याबरोबरच धुरफवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बांधकाम सुरू असलेली ठिकाणे ही आजराची हॉटस्पॉट असल्याने कंस्ट्रक्शन ड्राईव्ह हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे लेप्टोला आळा घालण्यासाठी आतापर्यंत ६ लाख ७१ हजार ६६३ घरांमधील २५ लाख ८३ हजार २३९ नागरिंकांची तपासणी केली आहे. ३५ हजार २१ ज्येष्ठ तर ८२९ लहान मुलांना औषधांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ७२ हजार ९२१ उंदरांच्या बीळांवर पेस्ट कंट्रोल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -