घरक्राइमThane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाकडून गुंतवणूकदारांची 175 कोटींची फसवणूक

Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाकडून गुंतवणूकदारांची 175 कोटींची फसवणूक

Subscribe

भिवंडी : हक्काचं आणि स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु गगनाला भिडलेल्या जागेच्या आणि घरांच्या किमतीमुळे प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. याच गोष्टीचा फायदा घेत भिवंडीतील ग्रामीण भागात अप्पर ठाणे म्हणून जाहिरातबाजी करत सुमारे 4 हजारांहून अधिक नागरिकांची स्वप्नातील स्वस्त आणि हक्काची घरे बनवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 175 कोटी रुपयांहुन अधिकची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत गृहविभागाने व्यावसायिकाची मालमत्ता व बँक खाते  सील करण्याचे आदेश दिले आहेत. (175 crore fraud of investors by a Mahaveer Patwa builder in Chief Minister Eknath Shinde Thane Bhiwandi)

भिवंडीतील अंजुर फाटा चिंचोटी महामार्गावर असलेल्या मालोडी, खार्डी, पाये, पायगाव परिसरात अप्पर ठाणे वसवणार असून हायफाय सोसायटीसारखी सर्व सुविधा असणारी घरे स्वस्तात मिळणार असे आमिष महावीर पटवा या बांधकाम कंपनीने 2010 मध्ये नागरिकांना दाखवले होते. महावीर पाटवा कंपनीने विविध ठिकाणी केलेल्या जाहीरातींना भुलून सुमारे 4 हजाराहून अधिक नागरिकांनी प्रकल्पात पैशांची गुंतवणूक केली. मात्र महावीर पटवा बांधकाम प्रकल्पाचे व्यवसायिक राजेश पटवा यांनी गृह प्रकल्प अर्धवट सोडून गुंतवणूकदारांचे सुमारे 175 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Balasaheb Thorat : 3 राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये फुटीचे वातावरण? बाळासाहेब थोरात म्हणतात

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात अप्पर ठाणे म्हणून राजेश पटवा या विकासकाने महावीर पटवा या प्रकल्प अंतर्गत महावीर सिटी, महावीर गलेक्सी, महावीर सृष्टी, महावीर पॉईंट व महावीर रत्ना पार्क असे पाच प्रकल्प 2009 पासून सुरू केले. 6 ते 7 लाखात 1BHK, 12 ते 13 लाखात 2BHK व 18 ते 20 लाखात 3BHK फ्लॅटची विक्री करण्यात आली. या प्रकल्पामध्ये शाळा हॉस्पिटल, स्विमिंग पूल, जिम, मेडिकल, मॉल अशा अनेक प्रकारच्या सुविधा असणार असल्याचे महावीर पटवा यांनी सर्व सामान्य जनतेला स्वप्न दाखवले. तशाप्रकारच्या मोठमोठ्या जाहिराती पाहून हजारो नागरिकांनी या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली. मात्र शासनाने या प्रकल्पास अनाधिकृत सांगत कारवाई केली आणि संपूर्ण बांधकाम थांबवले. शासनाच्या या कारवाईनंतर गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. पण पटवा बिल्डर्सने त्यांना वारंवार टाळाटाळ केली. गुंतवणूकदारांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे.

- Advertisement -

गुंतवणूकदारांनी याप्रकरणी महावीर पटवा प्रकल्पाचे कर्ताधर्ता राजेश पटवा यांच्याविरोधात 2017 मध्ये भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला व राज्य शासनाकडे देखील तक्रार दाखल केली होती. दरम्यान या गुन्ह्यात विकासक पटवा जामिनावर बाहेर आहे. मात्र गुंतवणूक दारांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल राज्याच्या गृह विभागाने घेत व्यावसायिकाची मालमत्ता व बँक खाते सील करण्याचे आदेश 10 नोव्हेंबर 2023 रोजी दिले.

हेही वाचा – Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगावे की…; युतीसंदर्भात नितेश राणेंचे आव्हान

राज्य शासनाच्या आदेशानंतरही गुंतवणूकदारांना कोणताही मोबदला अथवा रकमेचा परतावा मिळाला नाही. गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह लवकरात लवकर परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांची आहे. या संदर्भात गुंतवणूकदारांनी  लेखी निवेदन भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात दिले आहे. तर दुसरीकडे हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यात सुरू असल्याने फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची अपेक्षा केली आहे.

भिवंडी प्रांताधिकारी काय म्हणाले?

महावीर पटवा प्रकल्पात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ठेवीदारांच्या संरक्षण कायदा अंतर्गत भिवंडी प्रांताधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शासनाकडून मिळकतीच्या तपशीलनुसार बंदीची कारवाई करण्यात येत आहे. मात्र संबंधित प्रकल्प जप्त करण्यात येणार असून पुढील आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप यांनी सांगितले.

हेही वाचा –  Cough Syrup : खोकल्यासाठी कफ सिरप घेताय? 50 हून अधिक कंपन्या गुणवत्ता चाचणीत नापास

अडकलेले पैसे व्याजासह मिळावे – गुंतवणूकदार

दरम्यान, महावीर पटवा प्रकल्पात गुंतवणूक करणारे नागरिक गरीब आहेत. आपले स्वत:चे घर असावे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजी असेल किंवा घरातील दागदागिने मोडून प्रकल्पात पैशाची गुंतवणूक केली. मात्र शासनाने प्रकल्प अनधिकृत ठरवल्यानंतर आजपर्यंत गुंतवणूकदारांना घर मिळाले नाही. मात्र रजिस्टर झालेल्या घरांच्या कर्जाचे हफ्ते बँक वसूल करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार मेटाकुटीला आले आहेत. 2010 साली घरासाठी घेतलेल्या कर्जावर बँकेकडून व्याज वसूल केला जात असल्यामुळे आमचे पैसे व्याजासह परत मिळावे, अशी मागणी या गुंतवणूकदारांची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -