घरमुंबईस्वच्छतेच्या रँकिंगमध्ये वर येण्यासाठी ठाणे नगरपालिकेची नामी युक्ती

स्वच्छतेच्या रँकिंगमध्ये वर येण्यासाठी ठाणे नगरपालिकेची नामी युक्ती

Subscribe

ठाणे नगरपालिकेनं नव्यानं स्थापित केलेल्या रस्त्यावरील हाय-टेक कचरापेटी वापरण्याकरिता रहिवाशांना सोन्याच्या नाण्याचं आमिष देण्याची नामी युक्ती लढवली आहे. ठाण्याच्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या पुढाकारान्वये, हाय-टेक कचरापेटीमध्ये कचरा टाकणाऱ्यांना रहिवाशांना लकी ड्रॉमधून सोन्याची नाणी जिंकण्याची संधी मिळणार असून पहिल्या २०० टेकबिन्सना कचरा टाकणाऱ्या व्यक्ती) डिस्काऊंट कूपनपासून ते मोबाईल फोन्सपर्यंत बक्षीस मिळवता येतील. कचरापेटीचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा आणि शहर स्वच्छ राहावे यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे. २०१६ मध्ये केलेल्या भारतातील स्वच्छ सर्वेक्षणानुसार ठाण्याचे स्थान ११६ व्या क्रमांकावर असून १७ स्थानानं घसरलं आहे.

टेकबीनची क्षमता

पहिल्या टप्प्यात ३० टेकबीन्स स्थापित करण्यात येतील. प्रत्येक टेकबीनमध्ये १९० क्युबीक मीटरचा ओला आणि सुका कचरा सामावून घेण्याची क्षमता आहे. ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणी हे टेकबीन्स स्थापित करण्यात येणार आहेत. एशियन गॅलांट या कंपनीला पुढील १० वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आलं आहे. टेकबीन्समधून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिलेत.

- Advertisement -

कार्यकर्त्यांना टेकबीन्सच्या वापराबाबत शंका

ठाण्यातील काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हा पुढाकार स्तुत्य आहे. मात्र, मिळणाऱ्या बक्षीसांचं आमिष इतर शहरातील लोकांना ठाण्यात येऊन कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त करू शकते. त्यामुळे स्थानिक लोकांनाच याचा लाभ मिळावा हे पालिकेनं सुनिश्चित करावं. कचऱ्याच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा होऊन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असाही सूर काही कार्यकर्त्यांनी आळवला आहे.

हाय-टेक कचरापेटीचा कसा वापर

  • प्लेस्टोअरमधून टेकबीन हे अॅप डाऊनलोड करून आपल्या फोनमधून तुमचं नाव नोंदवा.
  • ओला किंवा सुका कचरा टाकण्यासाठी तुमच्या जवळील कोणतेही टेकबीन तुम्ही वापरू शकता. कचरा किती असावा यावर कोणतंही बंधन नाही.
  • वापर केल्यानंतर बिनच्या स्क्रिनवर येणारा युनिक कोड कंपनीला पाठवावा.
  • तुमच्या ई-मेल अथवा फोनवर रोजच्या डिस्काऊंट ऑफरची माहिती पाठवण्यात येईल.
  • महिन्यात एक लकी ड्रॉ धारकाला सोन्याचं नाणं जिंकण्याची संधी मिळेल.
  • कचरा कितीही वेळा टाकण्यास संमती आहे. मात्र, बक्षीसांसाठी उपभोक्ता केवळ एका वेळी एकदाच नोंदणी करू शकेल.
  • या कचऱ्यापेट्या पूर्ण भरल्या आहेत की नाही हे कळण्यासाठी सेन्सर लावण्यात आला असून ते साफ करण्यासाठी अलर्ट वाजेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -