घरमुंबईशाळेची इमारत डी-मार्टला देण्याचा कट ;ठाणे महानगरपालिकेचा प्रताप

शाळेची इमारत डी-मार्टला देण्याचा कट ;ठाणे महानगरपालिकेचा प्रताप

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या अनेक शाळा पटसंख्ये अभावी बंद पडल्या जात आहेत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या इमारती या खाजगी संस्थांना अथवा उद्योग समुहांना देण्याचे कुटील धोरण सध्या ठाणे महानगर पालिकेच्यावतीने राबवण्यात येत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून होत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या अनेक शाळा पटसंख्ये अभावी बंद पडल्या जात आहेत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या इमारती या खाजगी संस्थांना अथवा उद्योग समुहांना देण्याचे कुटील धोरण सध्या ठाणे महानगर पालिकेच्यावतीने राबवण्यात येत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून होत आहे. सावरकर नगर भागातील शाळा क्रमांक 103 मधील इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर, सीनिअरच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना विश्वासात न घेता, येथील सुमारे 108 विद्यार्थ्यांचे स्थलातंर करून रिकामी झालेली इमारत डी-मार्ट या उद्योगसमुहाला देण्यात येणार असल्याचा डाव रचला जातआहे.
येथील वर्गाचे स्थलांतर करण्यात आलेल्या इमारतीमध्ये आधीच क्लासरूम कमी आहेत. पहिली, दुसरी आणि तीसरी,चौथी असे दोन-दोन इयत्तेचे वर्ग एकाच ठिकाणी भरवण्यात येत आहेत. यामुळे मुलांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच ज्युनिअर आणि सिनिअरच्या मुलांना या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी छोट्या मुलांचा शौचालयाचा प्रश्न आहे. या इमारतीतील शौचालयाला उंच जिने असल्यामुळे लहान मुलांना त्या ठिकाणी जाणे मुश्किल होते. शिवाय जीन्यावरून पडून दुखापत होण्याची शक्यता आहे.

आधीच्या इमारतीत लहान मुलांसाठी व्यवस्थित शौचालयाची सुविधा होती. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांना येथे दाखल केले. मात्र स्थलांतरामुळे लहान मुलांच्या एकूणच सुविधांचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पालकवर्गाने म्हणणे आहे. इंग्रजी शाळेतील पूर्व प्राथमिक वर्ग हे खाजगी संस्थेला सुरु करण्यासाठी दिले आहेत. ठामपाच्या शिक्षण समितीच्या विरोधात अनेकवेळा आंदोलन करूनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालकवर्ग संताप व्यक्त करित आहे.

- Advertisement -

मुळात शाळेच्या समोरची जागा म्हाडाची आहे, असे असताना शाळेच्या दोन इमारतीमध्ये मोठा स्टेज उभारण्यात आला आहे. शाळेच्या भींतीला लागूनच शिव अभिमान व्यायामशाळा आहे. तसेच त्याच्या बाजूला काही जागा कॅटरर्सला भाड्याने देण्यात आली आहे. या जागेचे भाडे कोण घेते? जर शाळेला सीएसआर फंडातून खर्च मिळत असेल तर या सर्व गोष्टी करण्याचा गरज काय? सिनिअर आणि ज्युनिअरच्या वर्गांना स्थलांतरीत करण्याची गरज काय? इमारतीमध्ये मागील दोन वर्षापासून डी-मार्टचे कार्यालय आहे? याचा अर्थ काय होतो? सदर शाळेची ही जागा खाजगी कंपनीला देण्याचा घाट आता उघड झाला आहे.
– गुरू गवळी (माजी विद्यार्थी, स्थानिक कार्यकर्ता)

पालकवर्गाची दिशाभूल करून गैरसमज पसरविण्यात आला आहे. सावरकर नगर येथील पालिका शाळा क्र. 3 ही पालिकेचीच शाळा आहे. डी मार्टला दिली नाही, डी-मार्ट या कंपनीने हा पुढाकार घेऊन वर्तकनगर येथील सावरकर नगर येथील शाळेतील प्राथमिक ज्युनिअर आणि सिनियर केजीचे सुरु असलेले वर्ग हे स्थलांतरित करीत समोरच असलेल्या पालिकेच्या शाळेत तळमजल्यावर स्थलांतर करण्यात आले आहे. या लहान मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून सुरक्षिततेच्या सर्व सुविधांनी स्थलांतर करीत असताना काही राजकीय पक्ष याला विरोध करीत आहेत
– विकास रेपाळे, शिक्षण समिती सभापती, ठामपा

- Advertisement -

सावरकर नगर येथील पालिका शाळेत डी-मार्टचे कार्यालय नाही, तर लॅब आणि लायब्ररी निर्माण करण्यात येत आहे. तेव्हा पालकांनी गैरसमजाला बळी पडू नये. पालक वर्गात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच पालकांशी संवाद साधून त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल.
– मनिष जोशी, उप आयुक्त, शिक्षण अधिकारी ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -