घरCORONA UPDATECorornavirus: ठाण्यात रुग्णांची लुट करणाऱ्या खासगी रूग्णालयांना चाप

Corornavirus: ठाण्यात रुग्णांची लुट करणाऱ्या खासगी रूग्णालयांना चाप

Subscribe

ठाण्यात करोनाबाधित रुग्णांना रुग्णालय ते क्वारंटाईन सेंटरपर्यंत नेण्यासाठी खासगी रूग्णालयाकडून तब्बल ११ ते १५ हजारांची मागणी करीत रूग्णांची अक्षरश: लूटमार सुरु होती. मनसेने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर अखेर पालिका आयुक्त विजय सिंघल या प्रकरणाची दखल घेत रूग्णालयाच्या लुटमारीला चाप लावला आहे. खासगी रूग्णालयांनी त्यांच्याकडील रूग्ण वाहिकेसाठी व इतर रूग्णवाहिका चालकांनी आरटीओ ने निश्चित केलेेल्या दराप्रमाणेच भाडे आकारण्यात यावेत, त्यापेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाहीत असे स्पष्ट आदेश आयुकतांनी दिले आहेत. तसेच आयुक्तांनी आरटीअचे दरपत्रकही प्रसिध्द केल्याने करोना रूग्णांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी दै आपल महानगरने “करोनाबाधित रूग्णांची रूग्णालयाकडून लूटमार” या आशयाखाली वृत्त प्रकाशीत केलं होतं.

Mymahanagar news
आपलं महानगरने दिलेली बातमी

ठाण्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकिकडे रूग्णालयातील सुविधांवर ताण पडत असतानाच दुसरीकडे खासगी रूग्णालयाकडून रूग्णवाहिकांच्या सेवेतून लुटमार होत असल्याचा प्रकार मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी चव्हाटयावर आणला होता. करोनाबाधित रूग्णांकडून खासगी रूगणालयामार्फत दिल्या जाणा-या सेवेसाठी ११ ते १५ हजार रूपये मोजावे लागत होते. गोरगरीब व सर्वसामान्य रूग्णांची खासगी रूग्णालयाकडून होणा-या लुटमारीसंदर्भात पालिकेने कारवाई करावी अशीही मागणी महिंद्रकर यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली होती. दै आपलं महानगरने ही “करोनाबाधित रूग्णांची रूग्णालयाकडून लूटमार” या आशयाखाली वृत्त प्रकाशित करून याला वाचा फोडली होती.

- Advertisement -

 

अखेर या गंभीर प्रकरणाची दखल आयुक्त विजय सिंघल यांनी घेत, रूग्णवाहिकेच्या सेवेबाबत किती दर आकारले जावेत यासंदर्भातील आरटीओचे रूग्ण्सावाहिन्यांबाबतचे दरफत्रक जाहीर केले आहे. तसेच आरटीओ दरपत्रकापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येऊ नये अस कोव्हिड संबंधातल रूग्णवाहिकेचे काम करीत असताना संबधित रूग्णवाहिका व कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पीपई किटस वापरणे तसेच नवीन रूग्ण घेण्यापूर्वी विनाविलंब सोडीयम हॉयपोक्लोराईट व अन्य केमिकल्स वापरून रूग्णवाहिका निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याच्या सुचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल आणि आपलं महानगरचे आभार मानले.

- Advertisement -

तक्रार नोंदवण्याचे आवाहन

रुग्णवाहिका चालक हे आरटीओच्या दरांपेक्षा अधिक दर आकारत असल्यास ०२२ – २८०१३८३८ या क्रमांकावर (सकाळी १० ते ६)  या वेळेत अथवा [email protected] या ईमेलवर गाडी क्रमांकासह तक्रार नोंदवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

असे आहे दरपत्रक

ठाणे व नवी मुंबई पालिका हद्दीसाठी :

* मारुती व्हॅन रुग्णवाहिका (विना वातानकुलित ) : (० ते १० किमी) : ५०० रुपये, (१० ते २० किमी) १ हजार, (२० ते ३० किमी) दीड हजार, (३० किमीपेक्षा जास्त) २० ₹ प्रति किमी

* टाटा सुमो व मॅटोडोअर रुग्णवाहिका ( विना वातानकुलित) : (० ते १० किमी) : ६०० रुपये, (१० ते २० किमी) १२००, (२० ते ३० किमी) १६००, (३० किमीपेक्षा जास्त) २३ ₹ प्रति किमी

* टाटा ४०७ व मिनी बससदृश्य रुग्णवाहिका ( विना वातानकुलित) : (० ते १० किमी) : ७०० रुपये, (१० ते २० किमी) १३००, (२० ते ३० किमी) १७००, (३० किमीपेक्षा जास्त) २५ ₹ प्रति किमी

*कार्डिअक रुग्णवाहिनीका ( वातानकुलित) (० ते १० किमी) : २००० रुपये, (१० ते २० किमी) ३०००, (२० ते ३० किमी) ४०००, (५५ किमीपेक्षा जास्त) २५ ₹ प्रति किमी

कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई महानगरपालिका क्षेत्र व ठाणे ग्रामीण परिसर

* मारुती व्हॅन रुग्णवाहिका (विना वातानकुलित ) : (० ते १० किमी) : ४०० रुपये, (१० ते २० किमी) ८०० रूपये , (२० ते ३० किमी) बाराशे रूपये , (३० किमीपेक्षा जास्त १८ ₹ प्रति किमी

* टाटा सुमो व मॅटोडोअर रुग्णवाहिका ( विना वातानकुलित) : (० ते १० किमी) : ४५० रुपये, (१० ते २० किमी) ९०० रूपये , (२० ते ३० किमी) १३५० रूपये , (३० किमीपेक्षा जास्त) २० ₹ प्रति किमी

* टाटा ४०७ व मिनी बससदृश्य रुग्णवाहिका ( विना वातानकुलित) : (० ते १० किमी) : ५०० रुपये, (१० ते २० किमी) १०००, (२० ते ३० किमी) १५००, (३० किमीपेक्षा जास्त) २२ ₹ प्रति किमी

*कार्डिअक रुग्णवाहिनीका ( वातानकुलित) (० ते १० किमी) १८०० रुपये, (१० ते २० किमी) २६००, (२० ते ३० किमी) ३५००, ५० ₹ प्रति किमी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -