घरताज्या घडामोडीCorona: पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

Corona: पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दोन जुळ्या भावांचा कोरोनाने बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी खाकी वर्दीतील कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, कर्तव्य बजावत असताना अनेकांना आपेल प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, पोलीस दलातील दोन जुळे जण या महामारीत शहीद झाल्याची घटना समोर आली आहे. दिलीप रामचंद्र घोडके (५६) आणि जयसिंग रामचंद्र घोडके (५६ ) या दोन जुळ्या भावांचा आठ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्घये घडली आहे.

दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. यापैकी दिलीप हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तर जयसिंग हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

- Advertisement -

गेल्या ८ दिवसांपू्र्वी म्हणजे २० जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर २८ जुलै रोजी त्यांचे भाऊ जयसिंग यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या ८ दिवसांच्या फरकारने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला आहे. दोघांच्याही जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ पोलीस ठाणे आणि हिललाईन पोलीस ठाण्यातील सहकार्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.


हेही वाचा – महापालिका आयुक्त खोटारडे! मृत्यूचे आकडे लपवले; किरीट सोमय्या यांचा घणाघात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -