ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदान क्षेत्राकरिता निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले यामध्ये मतदानाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत 148- ठाणे शहर मतदार संघात 52 पॉईंट 41 टक्के मतदान झाले. या मतदार संघात तिहेरी लढत झाली, भाजपचे संजय केळकर, शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव यांच्यामध्ये झालेली लढत पाहता. या मतदार संघात निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर 147 कोपरी पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी लढवत होते, यांच्या विरोधात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचे केदार दिघे होते. या मतदारसंघात सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 55.77% मतदान झाले . तर जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण परिसरात सायंकाळपर्यंत 61. 93 टक्के मतदान झाले,यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद दिला. मतदान करताना पोलिंग बूथ येते शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची तसेच भांडणाचे प्रकार देखील झाले परंतु बाकी विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले यामध्ये 134- भिवंडी ग्रामीण मतदारसंघात 61.93% मतदान झाले, 135 शहापूर विधानसभा क्षेत्रात 59.12 टक्के मतदान झाले, 136- भिवंडी पश्चिम मतदार संघात 46.1 टक्के मतदान झाले, भिवंडी पूर्व मतदार संघात 45.6 टक्के मतदान झाले, 138- कल्याण पश्चिम मतदार संघात 41 टक्के मतदान झाले, 149- मुरबाड मतदार संघात 51.16 टक्के मतदान झाले, 140- अंबरनाथ मतदार संघात 43. 78 टक्के मतदान झाले, 141- उल्हासनगर मतदारसंघात 43.4 टक्के मतदान झाले ल,142- कल्याण पूर्व मतदारसंघात 52.53 टक्के मतदान झाले, 143- डोंबिवली मतदारसंघात 51. 68 टक्के मतदान झाले, 144 – कल्याण ग्रामीण मतदारसंघात 51. 64 टक्के मतदान झाले, 145 मीरा-भाईंदर मतदार संघात 48. 36 टक्के मतदान झाले, 116 ओवळा माजिवडा मतदार संघात 46.39 टक्के मतदान झाले,147- कोपरी- पाचपाखडी मतदारसंघात 55.77 टक्के मतदान झाले, 148 – ठाणे शहर मतदार संघात 52.41 टक्के मतदान झाले,149 मुंब्रा -कळवा मतदार संघात 47.52 टक्के मतदान झाले, 150 – एरोली मतदार संघात 50.88 टक्के मतदान झाले, 151- बेलापूर मतदार संघात 51.41 टक्के मतदान झाले.
विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर मोठ्या उत्साहात झाले, कुठे पैसे वाटण्याचे प्रकार झाजे तर कुठे भांडणाचे प्रकार झाले. मतदानाच्या दिवशी पहाटे 7 वाजल्यापासून नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावून मतदान केले.