घरमनोरंजनस्व. अभिनेते गुरुदत्त यांच्या त्या व्यक्तिरेखेला स्व. बाळासाहेब ठाकरेंचा हातभार होता ...

स्व. अभिनेते गुरुदत्त यांच्या त्या व्यक्तिरेखेला स्व. बाळासाहेब ठाकरेंचा हातभार होता ?…

Subscribe

"बाळासाहेब ठाकरे ह्यांनी कधी चित्रपटात काम केलं होतं का? तर त्याचं उत्तर 'हो' आहे... ठाकरे घराण्याचं आणि कलावंतांचं नातं काल-परवाचं नाही तर ते गेल्या ४ पिढ्यांचं आहे. आचार्य अत्रे ह्यांच्या आग्रहास्तव प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी प्रथम 'राष्ट्रीय पुरस्कार' विजेत्या 'श्यामची आई' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता हा किस्सा सर्वश्रुत आहेच. परंतु बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे, हे तितकंसं कुणाला ज्ञात नाही."

दोन दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च समजला जाणारा मनाचा भारतरत्न पुरस्कार नुकतेच काही सन्माननीय व्यक्तींना देण्यात आले. अशातच मनसे कडून भारतातील प्रख्यात व्यंगचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी MNS अधिकृत या मनसे च्या फेसबुक पेजवरून करण्यात आली असून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्रांनी स्वतंत्र भारतानंतर जनतेत खदखदणाऱ्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली, असेही त्यात म्हटले आहे.

याच मागणीच्या अनुषंगाने याच मनसेच्या फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्यात मनसे तर्फे म्हटलं आहे की, “बाळासाहेब ठाकरे ह्यांनी कधी चित्रपटात काम केलं होतं का? तर त्याचं उत्तर ‘हो’ आहे… ठाकरे घराण्याचं आणि कलावंतांचं नातं काल-परवाचं नाही तर ते गेल्या ४ पिढ्यांचं आहे. आचार्य अत्रे ह्यांच्या आग्रहास्तव प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी प्रथम ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेत्या ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटात अभिनय केला होता हा किस्सा सर्वश्रुत आहेच. परंतु बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे, हे तितकंसं कुणाला ज्ञात नाही.”

- Advertisement -

स्व. बाळासाहेब ठाकरे पट्टीचे व्यंगचित्रकार होते त्यामुळे या व्हिडिओचं स्पष्टीकरण देताना मनसेनं  पुढं असं म्हटलंय की ,” मिस्टर आणि मिसेस ५५’ ह्या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नायक गुरुदत्त ह्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका वठवली आहे. चित्रपटात कुठे ना कुठे गुरुदत्त त्यांना व्यंगचित्र काढताना दाखवणं क्रमप्राप्त होतं. म्हणून चित्रपटातील एका प्रसंगात गुरुदत्त व्यंगचित्र रेखाटताना दाखवले आहेत. त्या फ्रेममध्ये चित्र रेखाटताना गुरुदत्त ह्यांचा क्लोजअप आहे पण जेव्हा कॅमेरा चित्राकडे वळतो तेव्हा जो रेखाटतानाचा हात आहे तो २९ वर्षीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्या चित्रातील फटकारे, शैली पाहिल्यानंतर तुम्हालाही हे जाणवेल. त्यातली रेषा आणि शैली बाळासाहेबांचीच आहे.”पुढे याच पोस्टमध्ये

स्व. बाळासाहेबांना भारतरत्न का दिला जावा याच विस्तृत स्पष्टीकरण मनसे तर्फे देण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय की, ” मात्र, त्यात एक गोष्ट सर्वांच्याच कल्पनेपलीकडली झाली ती म्हणजे एक व्यंगचित्रकार चित्रांच्या माध्यमातून जनमानस चेतवतो, त्यांचं रूपांतर संघटनेत होतं, अनेक सामान्य घरातील माणसं सत्तेच्या पदापर्यंत पोहोचतात आणि स्वतःच्या संघटनेची राज्यावर सत्ता येते. व्यंगचित्रकार ते राज्यकर्ता हा प्रवास इतका विलक्षण आहे की नंतर ‘बाळासाहेब ठाकरे’ हे व्यक्तिमत्त्वच चित्रपटाचा विषय बनतं. चित्रपटसृष्टीतलं एक असंही वर्तुळ बाळासाहेबांनी पूर्ण केलं होतं हे विशेष. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळायलाच हवा !”

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -