घरमुंबईमुंबई विद्यापीठात १४ वी राष्ट्रीय युवा संसद संपन्न

मुंबई विद्यापीठात १४ वी राष्ट्रीय युवा संसद संपन्न

Subscribe

संसदीय लोकशाही प्रणालीमधील कार्यपद्धती समजून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात १४ व्या राष्ट्रीय युवा संसदेचे शनिवारी ता. (१९) आयोजन करण्यात आले होते. या युवा संसदेसाठी मुंबईतील रुईया महाविद्यालय, कीर्ती महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, जयहिंद महाविद्यालय, मीठीबाई महाविद्यालय, पोद्दार महाविद्यालय, मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय, एसआयईएस महाविद्यालय, रत्नम महाविद्यालय, महाराष्ट्र महाविद्यालय, एस.के.सोमय्या महाविद्यालय, बाळासाहेब कॉलेज ऑफ लॉ, काळसेकर या महाविद्यालयातील एकूण ५५ विद्यार्थ्यांच्या संघाने सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीमधील प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेध, विधेयकावरील चर्चा अशा अनेक गोष्टींवर सखोल चर्चा करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य, शेती, विमा, वित्तीय तरतुदी अशा विविध विषयांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. १४ व्या राष्ट्रीय युवा संसदेमध्ये प्रथम पारितोषिक ज्युतिका सतघर, द्वितीय पारितोषिक प्रिया पेडणेकर, तृतीय पारितोषिक फातिमा कॉन्ट्रॅक्टर, प्रहर्षी सक्सेना, निझामी इल्यास, चतुर्थ पारितोषिक अनुष्का मोरे, नरमीन साजिद, सौरभ चव्हाण या विद्यार्थ्यांना उत्तम युवा संसदपटू म्हणून गौरविण्यात आले. या गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर संसदीय कार्य मंत्रालयातर्फे गौरविण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी यासाठीचे युवा संसद हे प्रभावी माध्यम असून लोकशाही मजबूत करणारा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -