घरमुंबई21 लाखांच्या सुंगधित लाकडाची चोरीप्रकरणी आरोपीस अटक

21 लाखांच्या सुंगधित लाकडाची चोरीप्रकरणी आरोपीस अटक

Subscribe

सुमारे 21 लाख रुपयांच्या सुगंधित लाकडाची चोरी करुन पळून गेलेल्या एका आरोपीस शिवडी येथून पायधुनी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. राशिदउद्दीन मतिउर रेहमान असे या 20 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 21 लाख रुपयांचा चोरीचा सुगंधित लाकडाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अयुब उबेदुल्ला शेख हे व्यापारी असून त्यांचे पायधुनीतील चकला स्ट्रिट परिसरात एस. एम. अयुब मलिक मनोजी नावाचे एक लाकडाचे दुकान आहे. 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर 2018 रोजीच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी दुकानातील कुलूप तोडून आतील 21 किलो वजनाचे 21 लाख रुपयांच्या अगरवूड या सुगंधी लाकडाच्या तुकड्याची चोरी केली होती. हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस येताच अयुब शेख यांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद होताच पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी कर्नाटक व नंतर आसाम येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या दोन्ही राज्यात त्याचा पोलिसांचा शोध घेतला, मात्र तिथे गेल्यानंतर तो पुन्हा मुंबईत निघून गेल्याचे पोलिसांना समजले.

- Advertisement -

मुंबईत परत आल्यानंतर तो शिवडीतील बीपीटी गोदामात लपवून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस नरीक्षक अविनाश कानाडे यांच्या पथकातील विजयसिंह भोसले, लिलाधर पाटील, प्रविण फडतरे, सदानंद सोलकर, श्रीकृष्ण दळवी, शिरीष सावंत, धोंडीराम माने, उमेश सूर्यवंशी, गणेश ठाकूर, विजय शिंदे,  यांनी शिवडीतून राशिउद्दीन रेहमान याला शिवडीतून पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -