घरमुंबईपिंपळेश्‍वरच्या बाप्पाला कोल्हापुरच्या महालक्ष्मीचा देखावा

पिंपळेश्‍वरच्या बाप्पाला कोल्हापुरच्या महालक्ष्मीचा देखावा

Subscribe

यंदा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात झालेल्या महाप्रलयंकारी पुरातून महालक्ष्मी देवीने अनेकांना तारले आहे. या श्रद्धेपोटी अशी आपत्कालिन परिस्थिती देशात पुन्हा निर्माण होऊ नये, असे साकडे पिंपळेश्‍वर सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मातेला घातले असून वाळकेश्वर-बाणगंगा परिसरातील या मंडळाने आपल्या पिंपळेश्वरच्या बाप्पाचा देखावा महालक्ष्मीच्या प्रतिकृतीतून साकारला. बाप्पाच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात साड्यांचे दान केले जाते. तसेच स्त्रीशक्तीचे सगळ्यात जागृत देवस्थान म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र कामाला लागले होते. यात थर्माकोल पिओपीची प्रभावळ न बनवता संपूर्ण देखावा पर्यावरण पूरक करण्यावर भर दिला आहे. हा देखावा नव्याकोर्‍या साड्यांपासून साकारला असून या मंडळात महालक्ष्मीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जो साड्यांचा साज असतो, अगदी तसाच देखाव या ठिकाणी उभारण्यात आला आहे.

पिंपळेश्‍वर सार्वजनिक मंडळाने पुरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे दान पेटीत पैसे टाकण्याऐवजी शालेय वस्तू दानपेटीत टाकण्याचा सल्ला मंडळाच्या वतीने देण्यात आला. दरवर्षी मंडळ सामाजिक भान जपत नवनवे देखावे तयार करते. तसेच स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. तसेच बाणगंगा तलाव जवळ असल्याने अनेक नागरिकांना गणपती विसर्जनासाठीही मदत केली जाते. तसेच पुन्हा तलाव स्वच्छतेसाठीही पुढाकार घेत असल्याचे मंडळाचे सचिव बिपीन कोकाटे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -