घरमुंबईउद्यापासून बेस्ट बसेस होणार सुरु; सामान्य प्रवाशांसाठी बेस्टचा अतिरिक्त फेर्‍या

उद्यापासून बेस्ट बसेस होणार सुरु; सामान्य प्रवाशांसाठी बेस्टचा अतिरिक्त फेर्‍या

Subscribe

खाजगी कार्यालये कामगारांच्या १० टक्के पद्धतीने उपस्थितीत राहणार असल्साने बेस्टकडून विशेष फेर्‍या

गेल्या दोन महिन्यापासून सर्व सामान्य प्रवाशांसाठी बंद असेलली बेस्ट सेवा सोमवार पासून पुन्हा सुरु होत आहे. अनलॉक-१ च्या दुसर्‍या टप्प्यात १० जूनपासून खाजगी कार्यालये कामगारांच्या १० टक्के पद्धतीने उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवाशांना सेवा पुरविणाची परवानगी बेस्ट उपक्रमाला देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने सोमवार ८ जूनपासून बेस्टचा फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रामधील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक रुग्णांची संख्या असणार्‍या महाराष्ट्रामध्ये खास करुन मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईची लाइफलाइन २२ मार्चपासून बंद केली आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक-१ च्या दुसर्‍या टप्प्यात परिवहन विभागाने अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांसाठी रिक्षा व टॅक्सींना परवानगी दिली आहे. त्यानंतर आता सोमवारपासून बेस्टच्या अतिरिक्त फेर्‍या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

येत्या १० तारखेपासून खाजगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याने कामावर जाणार्‍या प्रवाशांसाठी गैरसोय होऊ नयेत, याकरिता बेस्ट उपक्रमाकडून विशेष बेस्टचा फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसमध्ये केवळ चार ते पाच उभ्या प्रवाशांना परवानगी देण्यात येणार आहे. तसेच वर्कमन्स स्पेशल व रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या गाड्यांमध्ये सर्व सामान्य प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती बेस्टचा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

३ हजार पेक्षा जास्त फेर्‍या चालविणार

राज्य सरकारने १ जूनपासून ‘पुन्हा सुरूवात’ (मिशन बिगिन अगेन) अंतर्गत काही व्यवहारांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानूसार ५ जूनपासून अत्यावश्यक कामासाठी टॅक्सी प्रवासाला मुभाही देण्यात आली आहे. तर १० जूनपासून खाजगी कार्यालये कामगारांच्या १० टक्के पद्धतीने उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत.त्यामुळे कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नयेत, याकरिता बेस्टने प्रशासनाला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवाशांना सेवा पुरविणाची परवानगी देण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून बेस्ट प्रशासनाने सोमवार ८ जूनपासून पूर्वीप्रमाणेच दररोज ३ हजार पेक्षा जास्त फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे लॉकडॉउन काळात सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती.

मिशन बिगिन अगेनतंर्गत ज्या नागरिकांना शासनाने परवागी दिली आहेत. त्याच्या सुविधेसाठी बेस्टचा अतिरिक्त फेर्‍या सोमवारपासून चालविण्यात येणार आहे.

– सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यस्थापक,बेस्ट उपक्रम

- Advertisement -

त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करण्यार्‍या डॉक्टर, नर्सेंस, पोलिस, स्वच्छता कर्मचार्‍यांकरिता बेस्ट आणि एसटीकडून विशेष बस फेर्‍या चालविण्यात येत होते. बेस्ट उपक्रमाकडून दररोज १४०० ते १६०० फेर्‍या चालवत होते. तर एसटीकडून मुंबई, ठाणे आणि पालघर या ३ विभागातून जवळ जवळ ३५० एसटीच्या फेर्‍या चालविण्यात येत होत्या. मात्र आता खाजगी कार्यालये कामगारांच्या १० टक्के पद्धतीने उपस्थितीत राहणार असल्साने बेस्टकडून विशेष फेर्‍या चालविण्यात येणार आहे.


LockDown: एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -