Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सेलिब्रिटींना पालिकेच्या पायघड्या, बेस्ट कोविड योद्ध्यांच्या हक्कासाठी येरझार्‍या!

सेलिब्रिटींना पालिकेच्या पायघड्या, बेस्ट कोविड योद्ध्यांच्या हक्कासाठी येरझार्‍या!

एकीकडे बेस्ट कामगाराना योद्धा म्हणायचे आणि दुसरीकडे या बेस्टच्या खर्‍या नायकाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप बेस्ट कामगार संघटनाकडून करण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -
  1. महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण होताच, मुंबई महापालिकेकडून त्यांच्या चारही बंगले निर्जंतुकीकरण केले. पण बेस्टच्या सर्व आगार व विभागामध्ये कोरोनाचा प्रसार होत असताना कुठेही निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. भरपगारी रजा द्यावी लागेल म्हणून संपर्कात आलेल्या बेस्ट कामगारांना  क्वारंटाईन करण्याचे टाळले जात आहे. एकीकडे बेस्ट कामगाराना योद्धा म्हणायचे आणि दुसरीकडे या बेस्टच्या खर्‍या नायकाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप बेस्ट कामगार संघटनाकडून करण्यात येत आहे.

कोरोना महामारीच्या काळात मुंबई शहरांमधे वीजपुरवठा आणि बृहन्मुंबई परिसरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक या सेवा सातत्याने देण्याचे काम बेस्ट कामगार करत आलेले आहेत. सेवा देत असताना शेकडो बेस्ट कामगार कोरोनाची लागण झाली आहे. यात 60 कर्मचार्‍यांना दुर्दैवाने मृत्यू सुद्धा झालेला आहे. तरी सुद्धा आपल्या जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी आपली सेवा देत आहे. मात्र आता बेस्ट प्रशासनाने असंख्य बेस्ट कामगारांच्या वेतनात बेकायदेशीर कपात केली आहे. तसेच या कोरोनाचा संकटकाळात बेस्ट कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी बेस्टकडून पुरेशी सुरक्षा सामुग्री दिली जात नाही आहेत. अनेक आगारात बेस्ट कामगारांना कोरोनाची लागण झालेली आहे. मात्र आजपर्यंत आगाराचे निर्जंतुकीकरण केले नाही. संपर्कात आलेल्या कामगारांना कॉरनटाईन केले नाही. दररोज कामगार आपला जीव मुठीत घेऊन आपली सेवा देत आहे. मात्र बेस्ट प्रशासन आणि मुंबई महानगर पालिका बेस्ट कामगाराच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप बेस्ट कामगार संघटनांनी केले आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण होताच पालिकेकडून तातडीने त्यांच्या चारही बंगले निर्जंतुकीकरण करण्यांत आले आहे. मात्र साडे तीन महिन्यापासून बेस्ट कामगारांकडून डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांना सेवा देण्यात येत आहे. बेस्टमधील बळींचा आकडा शंभरीकडे निघाला आहे. त्यांच्या वारसांना ग्रॅच्युईटीही दिली नाही, पगार कापले आहेत, हे सर्व थाबले पाहिजे आहे. अन्यथा बेस्टचे खरे नायक या प्रशासनाला धडा शिकवेल.
– जगनारायण कहार, सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना
- Advertisement -