लोकार्पण होणाऱ्या मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ सेवेला पूरक बेस्ट उपक्रमाची बससेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध सरकारी, मुंबई महापालिका विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत असलेल्या मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या मेट्रोरेल आता दहिसर (पूर्व) ते डी. एन. नगर अंधेरी (प) पर्यत विस्तारीत करण्यात येत आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध सरकारी, मुंबई महापालिका विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत असलेल्या मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या मेट्रोरेल आता दहिसर (पूर्व) ते डी. एन. नगर अंधेरी (प) पर्यत विस्तारीत करण्यात येत आहे. तसेच मेट्रो-७ या सेवेचा – विस्तार गुंदवली – अंधेरी (पूर्व) पर्यत करण्यात येत आहे. (The bus service of the BEST initiative is complementary to the Metro 2A and Metro 7 services to be launched)

या अनुषंगाने उपरोक्त रेल्वे सेवांच्या स्थानकांदरम्यान सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेस्टच्या बससेवांव्यतिरिक्त काही नवीन बसमार्ग येत्या २० जानेवारीपासून सुरु करण्यात येत आहेत. या बसमार्गांद्वारे मेट्रो रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांना अतिरिक्त बससेवा उपलब्ध होणार आहे.

नवीन बसमार्ग क्र.ए-२९५ हा शांती आश्रम आणि चारकोप दरम्यान एक्सर, बोरीवली मेट्रोरेल स्थानक, गोराई आगार, चारकोप, पहाडी एक्सर मेट्रोरेल स्थानक मार्गे वर्तुळाकार सेवेत प्रवर्तित होणार आहे. ही बस शांती आश्रम येथून पहिली बस सकाळी ७ वाजता तर शेवटची बस रात्री १०.३० वाजता असणार आहे.

मेट्रो-७ मार्गावर बसमार्ग क्र. ए-२८३

हा बसमार्ग दिंडोशी बसस्थानक येथून मेट्रो- ९ वरील दिंडोशी, कुरार, आकुर्ली मेट्रोरेल स्थानक मार्गे दामूनगर (विस्तारीत) पर्यत प्रवर्तित होईल. दिंडोशी बसस्थानक व दामूनगर (विस्तारीत) येथून ही बस सुटेल. पहिली बस दिंडोशी बसस्थानक येथून सकाळी ६.३० वाजता तर दामूनगर येथून ७ वाजता सुटेल. दिंडोशी बसस्थानक येथून रात्री १० वाजता तर दामूनगर येथून १०.३० वाजता सुटेल.

मेट्रो-२ ए व मेट्रो-७ मार्गावर बसमार्ग क्र.ए-२१६

हा बसमार्ग एन.एल. कॉम्प्लेक्स / सरस्वती संकुल येथून मेट्रो-२ ए व मेट्रो-७ च्या – दहिसर (पूर्व) मेट्रोरेल स्थानक मार्गे मेट्रो-७ च्या ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान मेट्रोरेल स्थानक मार्गे बोरीवली स्थानक (पूर्व) पर्यंत प्रवर्तित होईल. बोरीवली स्थानक (पूर्व) येथून सकाळी ६.३० वाजता व सरस्वती संकुल येथून सकाळी ७ वाजता पहिली बस सुटेल. शेवटची बस १०.३० वाजता सुटेल.


हेही वाचा – सीएसएमटी स्थानक कात टाकणार; पंतप्रधान मोदी करणार पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन