घरमुंबईपेपर व्हायरल करणार्‍यांनो ! केंद्रीय पर्यवेक्षक येतोय

पेपर व्हायरल करणार्‍यांनो ! केंद्रीय पर्यवेक्षक येतोय

Subscribe

पेपरफुटीच्या प्रश्नावर बोर्डाचे उत्तर

राज्यभरात मंगळवारी सुरू होणार्‍या बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाने नवी संकल्पना सुरू करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या काही परीक्षांदरम्यान मोबाइलवर पेपर व्हॉटअ‍ॅपवर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले असल्याने बोर्डाने यंदा केंद्रीय पर्यवेक्षक ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेनुसार आता सीलबंद २५ प्रश्नपत्रिकांचा संच केंद्रीय पर्यवेक्षकांच्या सहाय्याने परीक्षा केंद्रावर पोहचविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षा संपेपर्यंत हे पर्यवेक्षक त्याच परीक्षा केंद्रावर थांबणार असणार आहेत. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल होणार्‍या प्रश्नपत्रिकांच्या प्रश्नाला बोर्डाने नवे उत्तर शोधून काढले आहे.

गेल्या काही वर्षांचा इतिहास लक्षात घेता परीक्षा सुरू होण्याअगोदर मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. या प्रकरणात कोचिंग क्लास तरी काही ठिकाणी परीक्षा केंद्रातील बेजबाबदारपणा समोर आला आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षा या सुरळीत व्हाव्या यासाठी राज्य शिक्षण मंडळाने नवे शिवधनुष्य हाती उचलले आहे. त्यासाठी नवी संकल्पना बोर्डाने यंदा सुरु केली आहे. केंद्रीय पर्यवेक्षक असे या नवसंकल्पनेचे नाव असून या अंतर्गत प्रश्नपत्रिकेची ने-आण करण्यासाठी त्या त्या परीक्षा केंद्राबाहेरील पर्यवेक्षकाची निवड केली जाणार आहे. पर्यवेक्षकांच्या हाती २५ – २५ प्रश्नपत्रिकांचा सीलबंद संच देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर हा संच खुला करायचा असून जर सीलबंद संच नसल्यास संबंधितांवर कारवाई होण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

- Advertisement -

यंदापासून आम्ही पहिल्यांदाच ही संकल्पना राबविणार आहोत. या अंतर्गत केंद्रीय पर्यवेक्षकास त्या त्या परीक्षा केंद्रावर परीक्षा संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. २५ प्रश्नपत्रिकांचा एक संच असे विद्यार्थ्यांनुसार संच त्या पर्यवेक्षकांना देण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राबाहेरील व्यक्तींची या केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून निवड केली जाणार आहे. त्यानुसार आमची सर्व तयारी पूर्ण झाली असून यंदाची परीक्षा सुरळीत पार पडेल. – संदीप संगवे,सचिव, मुंबई विभागीय मंडळ

हे काळजीपूर्वक वाचा

1) प्रश्नपत्रिकेची ने-आण करण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेरील पर्यवेक्षकाची निवड
2) सीलबंद २५ प्रश्नपत्रिकांचा संच केंद्रीय पर्यवेक्षकांच्या सहाय्याने परीक्षा केंद्रावर पोहचविण्यात येणार
3) विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर हा संच खुला करण्यात येणार
4) सीलबंद संच नसल्यास संबंधितांवर कारवाई
5) परीक्षा संपेपर्यंत हे पर्यवेक्षक त्याच परीक्षा केंद्रावर थांबणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -