घरCORONA UPDATEमिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

Subscribe

कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाच पावसाळ्यानंतर मुंबईकरांना योग्यप्रकारे दिलासा म्हणून मान्सूनपूर्व कामांकडेही इकबाल सिंग चहल यांनी लक्ष वेधले आहे.

मुंबई महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाच पावसाळ्यानंतर मुंबईकरांना योग्यप्रकारे दिलासा म्हणून मान्सूनपूर्व कामांकडेही इकबाल सिंग चहल यांनी लक्ष वेधले आहे. कोरोनाचे युध्द एका बाजुला लढले जात असतानाच त्यांनी सोमवारी मिठी नदीची पाहणी करत सफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे असे निर्देश दिले. लॉकडाऊनच्या अडचणींवर मात करुन आपण कामांना गती दिल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच आता आवश्यक असल्यास अधिक संयंत्रे, मनुष्यबळ तैनात करावे. तसेच गरज असल्यास दोन सत्रांमध्ये काम पूर्ण करुन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करावेत, असेही निर्देश दिले.

मुंबई महापालिकेच्यावतीने मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी नवनियुक्त महापालिका आयुक्त  . इकबाल सिंग चहल यांनी केली. प्रारंभी त्यांनी माहिम कॉजवे येथील मिठी नदीचे पातमुख (आऊटफॉल) ची पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात अमेरिकन स्कूल मागील आणि बीकेसी पूर्व- पश्चिम जोडणारा उड्डाणपूल येथेही भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे, प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) संजय जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची ‘कोरोना कोविड १९’ या आजाराशी एकीकडे दिवस-रात्र लढाई सुरू असतानाच दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर आवश्यक नागरी सेवा-सुविधांची कामे आणि प्रकल्प देखील निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील, याकडे महानगरपालिका प्रशासन कटाक्षाने लक्ष देत आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना कोविड- १९’ या संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या कारणाने पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण होण्यास अनेक आव्हाने व अडचणी असताना देखील महानगरपालिकेच्या स्तरावर सुव्यवस्थित नियोजन करून कामे वेळेतच पूर्ण होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. त्याची प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी आयुक्त चहल यांनी सोमवारी दुपारी भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी मिठी नदीच्या पावसाळ्यापूर्व कामांपैकी ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आयुक्तांना दिली.

मिठी नदी आणि त्यातील काढण्यात येणारा गाळ

मिठी नदीची एकूण लांबी : २१.५०५ किलोमीटर लांब

- Advertisement -

मिठीतून काढण्यात येणारा एकूण गाळ : सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन

पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणारा गाळ :  ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मेट्रीक टन

आतापर्यंतपर्यंत काढण्यात आलेला गाळ:  २६ हजार ११८ मेट्रीक टन

आतपर्यंत पूर्ण झालेले काम : पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या २९ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -