घरताज्या घडामोडीलालबाग ते दादरमधील रेल्वे आणि रस्ते पुलांच्या दुरुस्तीचा भार वाढला

लालबाग ते दादरमधील रेल्वे आणि रस्ते पुलांच्या दुरुस्तीचा भार वाढला

Subscribe

लालबाग ते दादरमधील पुलांचे अतिरिक्त कामांमुळे तब्बल दहा कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे.

मुंबईतील लालबाग ते माहिम, धारावी आदी परिसरातील रेल्वे पुलांसह रस्ते पूल आणि पादचारी पुलांच्या दुरुस्तीसाठी १६ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु हिमालय पूल दुघर्टनेनंतर नेमलेल्या सल्लागारांनी सुचवलेल्या अतिरिक्त कामांमुळे या सर्व पुलांचा खर्च तब्बल १० कोटींनी वाढला आहे. त्यामुळे ६० ते ७० टक्के अधिक दराने कंत्राटाची रक्कम वाढल्याची माहिती मिळत आहे.

विविध करांसह १६ कोटी रुपयांचे दिले होते कंत्राट 

महालक्ष्मी रेल्वे स्थानक, करीरोड रेल्वे स्थानक, शीव रेल्वेस्थानक, शीव रुग्णालया रेल्वे पूल, तसेच दादरचे टिळक पूल आणि दादर फूल मार्केट येथील रस्ते पूल तसेच माहिम फाटके येथील आणि दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पुलांच्या दुरुस्तीसाठी फेब्रुवारी २०१९मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअर्स यांना विविध करांसह १६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. परंतु हिमालय पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील शहर आणि उपनगरेमधील सर्व पूल आणि पादचारी पुलांचे सर्वेक्षण पुन्हा करून घेण्यात आले. त्यानुसार सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार आणि अंदाजपत्रकानुसार रेल्वे वरील पूल आणि पादचारी पूलांच्या खर्चात वाढ झाल्याचे महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाने माहिम फाटक येथील आणि म्हाडा प्राधिकरणाने दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीची काम सुरू केल्याने ही दोन्ही कामे वगळण्यात आली आहेत. मात्र, या अतिरिक्त कामांवर ९. ११ कोटी रुपयांचा खर्च वाढलेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता विमानतळावरून प्रवाशांची थेट होणार मुंबईबाहेर रवानगी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -