घरमुंबईकावळा काव काव करत राहिला पण कोकीळेला न्याय मिळाला; चित्रा वाघ यांचा...

कावळा काव काव करत राहिला पण कोकीळेला न्याय मिळाला; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना टोला

Subscribe

मुंबई : शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश आज (11मे) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले. या १६ आमदारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळेचे बंधन दिलेले नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे केव्हा यावरचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना (uddhav thackeray) टोला लगावला आहे. त्या म्हणाली की, आता हे सिद्ध झालंच … कावळा कोण आणि कोकिळा कोण?

चित्रा वाघ यांनी ट्वीट करताना म्हटले की, उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की कावळा कोण आणि कोकीळा कोण हे निकालातून कळेल…. आता हे सिद्ध झालंच … कावळा कोण आणि कोकिळा कोण? कावळा काव काव करत राहीला पण कोकीळेला न्याय मिळाला ! लोकशाहीचाच हा विजय! राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार! अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन!!! असे ट्वीट करताना चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरवर टॅग केले आहे. 

दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निकाल गुरुवारी दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकाल वाचन केले. सुमारे ३५ मिनिटे न्यायालयाने निकाल वाचन केले. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -