घरCORONA UPDATECoronaVirus : धारावीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्के!

CoronaVirus : धारावीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्के!

Subscribe

दादर-माहीम व धारावी या जी-उत्तर विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३७ टक्के असून धारावीत हे प्रमाण ४२ टक्के एवढे असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रुग्ण आता बरे होवून घरी परतू लागले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण मुंबईत २७ टक्के एवढे आहे. मात्र, दादर-माहीम व धारावी या जी-उत्तर विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३७ टक्के असून धारावीत हे प्रमाण ४२ टक्के एवढे असल्याचे दिसून येत आहे. धारावीत रुग्णांची संख्या तसेच मृतांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ४२ टक्क्यांवर आल्याने धारावीकरांसाठी मोठी दिलासाजनक बातमी आहे.

संपूर्ण मुंबईत आतापर्यंत ३० हजार ३५९ एवढे बाधित रुग्ण असून त्यामध्ये ९८८ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर धारावीत सोमवारपर्यंत १५८३ बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहेत. तर आतापर्यंत धारावीतून ५९९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. नागरिकांची तपासणी करून उपचार यंत्रणा त्वरीत राबवली जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दिवससभरात धारावीत आणखी ४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये माटुंगा लेबर कॅम्प येथे आणखी ८ रुग्ण आढळले. याशिवाय कुंभारवाडा येथे पाच रुग्ण तसेच डॉ. बलिगा नगर, होळी मैदान, पंचशिल इमारत, मंगल कैलाश इमारत, शास्त्री नगर, शाहू नगर, भीम नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, संघम गल्ली, ढोरवाडा, प्रेम मिलन इमारत, शेठवाडी चाळ, पीएमजीपी कॉलनी, महात्मा गांधी सोसायटी, कल्पतरु इमारत, सिता निवास चाळ, राजीव गांधी नगर, कोल्हापूर लेन, धारावी मेन रोड आदी ठिकाणी ४२ रुग्ण आढळून आले आहेत.

माहिम आणखी ३४ रुग्ण आढळले

माहिममधील पोलीस कॉलनीत ७ रुग्ण आढळून आले असून मोगल लेन ४ व निरवाना सोसायटीत ३ असे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. याशिवाय दालमिया रोड, आझाद नगर, मोरी रोड, पॅराडाईज अपार्टमेंट, सागर सोसायटी, एल. जे. रोड , जिजाई निवास, कोटनिस मार्ग, माहिम पोस्ट ऑफीस, काद्री मॅन्शन, मनमाला टॉवर, बाह्मणदेव सोसायटी, गिरगावकर वाडी, कापड बाजार तसेच लोकमान्य नगर आदी ठिकाणी दिवसभरात ३४ रुग्ण आढळले. त्यामुळे माहिममधील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३५१ एवढी झाली आहे.

- Advertisement -

दादरमध्ये २० रुग्णांची भर

दादरमध्ये दिवसभरात आणखी २० रुग्ण आढळून आले असून दादरमधील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २३९ एवढी झाली आहे. यामध्ये अनमोल सोसायटी, उदयाम इमारत, विजय नगर, आशिर्वाद इमारत, त्रिवेणी संगम, शिंदे वाडी, बावन चाळ, एम.डी इमारत, उपेंद्र नगर, स्टॅनी फर्नांडिस चाळ, इराणी इमारत, बगवानदास वाडी, एस.के. बोले रोड, निळकंठ इमारत, दादर पोलीस ठाणे आदी ठिकाणी दिवसभरात रुग्ण आढळून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -