घरमुंबईबेकायदा सरकारचा मृत्यू अटळ, तीन महिन्यात सरकार जाणार - संजय राऊत

बेकायदा सरकारचा मृत्यू अटळ, तीन महिन्यात सरकार जाणार – संजय राऊत

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. या निकालावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो, त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र ठरवले आहे. पण तरीही हे सरकार उसणं आवसान आणत आहेत. या सरकारचा अंत जवळ आला आहे. विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यात निर्णय घ्यायचा आहे.

संजय राऊत म्हणाले की, कालचा निकाल अगदी स्पष्ट आहे. ज्याला कायदा आहे त्यालाही तो कळला पाहिजे आणि जे कायद्याचे अभ्यासक नाही, त्यांनाही तो कळला पाहिजे. मात्र त्या निकालाचे चुकीचे विश्लेषण करुन भाजप आणि मिंधे गटाचे लोक हे एकमेकांना पेढे भरवत नाचत आहेत. सुप्रीम कोर्टाने काल दिलेला निकाल हा यांना नागडं करणारा निकाल आहे आणि हे दोन्ही गट काल नागडं होऊन नाचत होते.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील भरत गोंगावले यांनी दिलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फडणवीसांनी कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळली पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो, त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र ठरवले आहे. पण तरीही हे सरकार उसणं आवसान आणत आहे. या सरकारचा अंत आता जवळ आला आहे. तीन महिन्यात अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावरच अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार
संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकर मुलाखती देत आहेत. मीच अध्यक्ष आहे, मीच निर्णय घेणार आहे. परंतु संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा मुलाखती द्यायच्या नसतात, हे त्यांना माहिती नाही वाटतं. त्यांचा जर पूर्व इतिहास तपासला तर ते अनेक पक्ष फिरुन आलेले आहेत. ते सध्या संवैधानिक पदावर बसलेले आहेत आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावरच निकाल द्यावा लागणार आहे. तेव्हाची जी परिस्थिती होती, त्या आधारावरच त्यांना निकाल द्यायचा आहे. त्यामुळे या राज्यातील प्रशासन आणि पोलिसांना मी आवाहन करतो की, बेकायदा सरकारचे आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -