घरमुंबईमुंबई पोलिसांनी हाती घेतली 'ड्रग्ज फ्री कॅम्पस' मोहीम

मुंबई पोलिसांनी हाती घेतली ‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ मोहीम

Subscribe

मुंबई पोलिसांनी 'ड्रग्ज फ्री कॅम्पस' ही मोहीम हाती घेतली असून ठिकठिकाणी छापे घालून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना अटक केले आहे.

मुंबई पोलिसांनी एका नव्या मोहिमेला सुरूवात केली आहे. ‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ असे या मोहिमेचे नाव आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने या मोहिमेंतर्गत कारवाई करण्यास सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी २४ तासात वेगवेगळ्या ठिकाणी १३ जणांवर कारवाई केली आहे आणि त्यांना अटक देखील केले आहे. या १३ जणांमध्ये सात पुरूष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यांच्याकडून ३५ लाखांचा गांजा, हेरॉईनसारखे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

अंमली पदार्थविक्री टोळ्यांवर छापेमारी

अंमली पदार्थविरोधी पथकांचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी पाच युनिटच्या अधिकाऱ्यांचे गस्त वाढविण्याचे आदेश दिले होते. शाळा, कॉलेजच्या आसपासच्या परिसरातील तरूण मुलांना नशेच्या आहारी जाण्यास भाग पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवाजीनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळे जवळून मेहताब अब्दुल कुदृस शेख, इस्लाम रशीद शेख, फातिमा सय्यद, नसीमा शेख यांना घाटकोपर युनिटचे पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. चेंबूर आणि गोवंडी परिसरात राहणारे हे सर्वजण आहेत. यांच्याकडून १३५ कफ सिरपच्या बाटल्या, दोन लाखांचे हेरॉइन आणि १६ हजारांचा गांजा हे अंमली पदार्थ मिळाले आहेत. शाळा आणि कॉलेच्या परिसरात हे सर्वजण ड्रग्ज विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच ग्रॅंट रोड स्थानका जवळ बाबू दस्तगीर इब्राहिम शेख आणि सीता राकेश धोबी यांना आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक करून गांजा हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्या पथकाने वांद्रे रेल्वे टर्मिनल प्रवेशद्वारावर छापा घातला. याठिकाणावरून पथकाने शहबाज बशीर शेखला ताब्यात घेऊन त्याच्याकडे २ लक्ष ८८ हजाराचे हेरॉइन सापडले. अंधेरी पूर्व, साकीनाका परिसरात करवाई केली असता तिथून वांद्रे युनिटने लिंबिराज मुरूगन कोनार या तरूणाकडून १० हजारांचा गांजा ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या पथकाने दहिसर येथील सुधीर फडके पुलाखाली छापा मारला असता तिथून ७० किलो गांजा हस्तगत केला. तिथून पोलिसांनी लक्ष्मी ओलंदास, संपूर्णा मिस्त्री,भरत शाह यांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या या ‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ मोहिमेला शहरातील लोकांनी साथ दिली तर असे अनेक अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर नक्कीच जाप बसेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -