घरCORONA UPDATEवाया गेलेल्या रेल्वे पासचा कालावधी वाढवून मिळणार; प्रवाशांनो जुना पास जपून ठेवा!

वाया गेलेल्या रेल्वे पासचा कालावधी वाढवून मिळणार; प्रवाशांनो जुना पास जपून ठेवा!

Subscribe

२३ मार्चपासून ज्या प्रवाशांचा रेल्वे पास वाया गेला आहे. त्या प्रवाशांच्या पासेसची मुदत रेल्वेने वाढून दिली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लाेकल सेवा सुरु करताच त्यांना रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. २३ मार्चपासून ज्या प्रवाशांचा रेल्वे पास वाया गेला आहे. त्या प्रवाशांच्या पासेसची मुदत रेल्वेने वाढून दिली आहे. तसेच सर्व सामान्य प्रवाशांसाठी लाेकलची वाहतुक जेव्हा पुर्वीप्रमाणे सुरळीत सुरु हाेईल, तेव्हा मुंबईकरांना त्यांच्या वाया गेलेल्या दिवसाचा पासचा कालावधी वाढवुन मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तुमचा रेल्वेचा जुना पास जपून ठेवा.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा गेल्या ८६ दिवस बंद होती. दररोज लोकल सेवेतून ८० लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये ७५ टक्के प्रवासी हे पासधार असतात. २३ मार्चपासून लोकल सेवा बंद असल्यामुळे अनेकांच्या पासेस वाया गेले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पासाचे शिल्लक दिवस वाढवून देण्याची मागणी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि झेडआरयूसीसीचे सदस्य शशिकांत पर्येकर यांनी रेल्वे बाेर्डाला केली हाेती. प्रवासी तीन महिन्यांचे किंवा वार्षिक मुदतीचे पास काढत आसल्याने त्यांचे माेठे नुकसान झाल्याचे रेल्वे मंत्रालयाला पर्येकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले हाेते. त्यामुळे आता सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु होईल, तेव्हा या पासधारकांना वाया गेलेल्या दिवसाचा पासचा कालावधी वाढवून मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

- Advertisement -

तसेच आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सोमवार १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू झाल्या आहेत. मात्र, ज्या अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे पासाचे जेवढे दिवस वाया गेले आहेत. त्यांच्या रेल्वे पासात तेवढ्याच दिवसांची मुदतवाढ करून देण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जे आज लोकलने प्रवास करता अशा प्रवाशांचे पासाचे जेवढे दिवस वाया गेले आहेत, त्यांच्या रेल्वे पासात तेवढ्याच दिवसांची मुदतवाढ करून देण्यात येत आहे. जेव्हा सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु होईल. तेव्हा त्यांच्या पासेसची संबंधित रेल्वे निर्णय घेणार आहे.  
– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -