घरमुंबईमुंबईतील पहिला थ्रीडी मॅपिंग प्रकल्प; ‘डिजिटल’ रुपातील ‘प्रतिवरळी'

मुंबईतील पहिला थ्रीडी मॅपिंग प्रकल्प; ‘डिजिटल’ रुपातील ‘प्रतिवरळी’

Subscribe

थ्री डी मॅपिंग जागतिक शहरांमध्ये मुंबईचा चंचूप्रवेश, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वरळीचा हुबेहुब त्रिमितीय नकाशा, नागरी प्रकल्पांसाठी होणार मोलाची मदत.

मुंबई शहर भागातील जी/दक्षिण विभागाच्या अंतर्गत वरळी परिसराचा १० चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्रिमितीय नकाशा तयार करून डिजीटल स्वरुपातील ‘प्रतिवरळी’ साकारण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रकल्प मुंबई महानगराच्या नागरी प्रशासनासाठी मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे थ्री डी मॅपिंग असणाऱया आंतरराष्ट्रीय शहरांच्या यादीमध्येही मुंबईचाही चंचूप्रवेश झाला आहे.

वरळी हा राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांनी बृहन्मुंबई महानगर क्षेत्राचा डिजीटल स्वरुपात त्रिमितीय नकाशा तयार करण्यासाठी म्हणजेच थ्री डी मॅपिंग करण्यासाठी पालिका प्रशासनाला विशेष सूचना केली होती.

- Advertisement -

या प्रकल्पाच्या आधारे आता भविष्यामध्ये महापालिकेच्या विविध विभागांना, मुंबई महानगर प्रदेशातील राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांना महानगराचे नियोजन आणि व्यवस्थापनात मोठी मदत होणार आहे. तयार करण्यात आलेले थ्री डी मॅपिंग हे महापालिकेच्या क्लाउडवर असणार आहे. ज्यामध्ये महापालिकेच्या विविध विभागांची संपूर्ण भौगोलिक माहिती, सांख्यिकी, संगणकीय प्रणाली देखील उपलब्ध आहे. त्यामुळे कामकाजामध्ये एकमेकांशी समन्वय वाढवून नियोजन करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे, आर्थिक बचत व वेळेचीही बचत करणे शक्य होणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त तथा संचालक (माहिती व तंत्रज्ञान ) शरद उघडे यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. सदर डिजीटल थ्री डी तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड यांची मदत लाभली आहे. महापालिका प्रशासनाने जीआयएस, एसएपी, रोबोट, ड्रोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यापूर्वीच अवलंब केला आहे. त्यात थ्री डी मॅपिंगची भर पडली आहे.

- Advertisement -

आधुनिक काळात फक्त कागदावरचे नकाशे पाहून प्रशासन करणे तुलनेने आत्यंतिक कठीण आहे. डिजीटल तंत्रज्ञान आणि त्याच्या आधुनिक साधनांचा उपयोग करुन बनविलेले नकाशे हे प्रशासकिय कामकाजाचा दृष्टिकोनच आमूलाग्रपणे बदलून टाकतात. थ्री डी मॅपिंग अर्थात त्रिमितीय नकाशा पद्धतीने कोणत्याही परिसराचे आभासी परंतु हुबेहूब रुप पाहता येते. संपूर्ण ३६० अंशातील अवलोकन करुन, उंची-रुंदी, खोली, जाडी अशा सर्व पैलुंनी तो परिसर पाहता येतो. त्यामध्ये कोणताही बदल झाला तर लागलीच प्रत्यक्षात पडताळता येते व पुरावा म्हणून त्याचा उपयोगही करता येतो. भूस्थानिक नकाशा अर्थात जिओस्पेशियल मॉडेल हे नागरी प्रशासनासाठी महत्त्वाचे आहेत. फक्त प्रकल्पांची अंमलबजावणीच नव्हे तर पायाभूत सेवा-सुविधांचे योग्य नियोजन करुन त्यांचा दर्जा उंचावणे, नागरी सेवा-सुविधांचे मूल्यमापन करणे, आपत्ती व्यवस्थापन प्रभावीरित्या करणे, वातावरण बदलांच्या प्रभावाचे विश्लेषण करणे, जनतेची सुरक्षितता अशा एक ना अनेक कामकाजामध्ये या त्रिमितीय नकाशा तंत्रज्ञानाची बहुमोल मदत होते, असे श्री. उघडे यांनी सांगितले.

लाईट डिटेक्शन ऍण्ड रेंजिंग सर्वे म्हणजेच लिडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वरळीचा तंतोतंत असा थ्री डी नकाशा तयार करण्यात आला आहे. यामध्ये लहान आकाराच्या व वजनाने हलक्या विमानांच्या सहाय्याने हवाई चित्रीकरण, ड्रोनसारख्या उडणाऱया साधनांच्या सहाय्याने मोजमाप व चित्रीकरण (हाय रिझोल्यूशन पेलोड), जमिनीवर धावणाऱया वाहनांवर आधुनिक साधने लावून मोजमाप व चित्रीकरण (मोबाईल स्ट्रीट इमेजरी) करण्यात आले आहे. तसेच संवेदक (सेन्सर्स) देखील यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे प्रत्यक्ष भूभागाचे, परिसरातील प्रत्येक सेंटीमीटरचे देखील अत्यंत अचूक असे परिगणन होते. हे सर्व कामकाज एकत्रित करुन डिजीटल अंतिम स्वरुप दिले जाते. या पद्धतीने डिजिटल वरळी अर्थात वरळी परिसराचे जुळे भावंडच आता थ्री डी मॅपिंगच्या रुपाने अवतरले आहे, असे श्री. उघडे यांनी नमूद केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -