घरCORONA UPDATEलॉकडाऊनमध्ये आरोग्यासाठी ड्रोनचा पहिल्यांदाच प्रभावी वापर

लॉकडाऊनमध्ये आरोग्यासाठी ड्रोनचा पहिल्यांदाच प्रभावी वापर

Subscribe

ड्रोनमुळे एरिअल मॉनेटरिंग, आपत्कालीन प्रतिसाद, औषधांची आणि रक्ताच्या नमुन्याची तत्काळ डिलिव्हरी यासारखा मानवविरहीत उपयोग या कालावधीत झाला.

देशभरातील पोलिसांनी कोविड -१९ च्या लॉकडाऊन काळात ड्रोनचा उत्तम वापर केला आहे. अगदी गाव खेड्यातल्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील गल्ली बोळात ड्रोनचा उत्तम असा वापर या कालावधीत करण्यात आला. ड्रोनचे मॉडर्न तंत्रज्ञान हे पोलिसांसाठी एक उत्तम साधन या काळात वापरासाठी उपलब्ध झाले. ड्रोनमुळे एरिअल मॉनेटरिंग, आपत्कालीन प्रतिसाद, औषधांची आणि रक्ताच्या नमुन्याची तत्काळ डिलिव्हरी यासारखा मानवविरहीत उपयोग या कालावधीत झाला. त्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवणे शक्य झाले. इंटरनेट ऑफ ड्रोन्सचे प्लॅटफॉर्म असणाऱ्या फ्लाईट बेसच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. फ्लाईटबेस या स्टार्ट अपला डीएसटीमार्फत निधी उपलब्ध झाला.

आरोग्याच्या निमित्ताने ड्रोनचा इतका प्रभावी वापर हा पहिल्यांदाच लॉकडाऊनच्या कालावधीत करण्यात आला. पोलीस यंत्रणेकडून एकीकडे अहोरात्र काम सुरू असतानाच ड्रोनच्या तंत्रज्ञानाने पोलिसांचा मोठा कामाचा ताण हलका करण्यासाठी मदत झाली. ड्रोनमध्ये वापरण्यात आलेल्या लाऊडस्पिकर्स, सायरन, बिकन्सच्या माध्यमातून लोकांच्या सुरक्षेसाठी ड्रोन उपयुक्त ठरले आहेत. अनेक ठिकाणी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत म्हणून ड्रोनचा वापर अतिशय प्रभावीपणे करण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून लोकांना इशारा देतानाच हा सगळा फीडदेखील मध्यवर्ती कंट्रोल रूमच्या ठिकाणी पाठवण्यासाठी मदतीचा ठरला.

- Advertisement -

फ्लाईटबेस ही पुणे स्थित ड्रोन ऑटोमेशन एंटरप्राईज आहे. पोलिस यंत्रणेला इंटरनेट ऑफ ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपयुक्त असा व्हिडिओ फीड देण्याचे काम यंत्रणेतून होते. हे क्लाऊड बेस बिझनेस एप्लिकेशन असून यासाठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स एण्ड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश यासारख्या राज्यांनी या आयओडी प्लॅटफॉर्मचा वापर वापर केला आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी ड्रोनची मदत होतानाच प्रासंगिक आणि तत्काळ फीड पाठवण्यासाठीही या ड्रोनचा वापर झाला आहे. पोलिसांना प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणी उपस्थित न राहता कंट्रोल रूममधूनच एखाद्या घटनेचा आढावा घेण्यासाठी फ्लाईटबेस ही यंत्रणा उपयुक्त ठरली आहे. एखाद्या ठिकाणी आवश्यकतेनुसार ड्रोन वापरून सेंट्रल डॅशबोर्डला फीड पाठवण्यासाठी या फ्लाईटबेस सोल्यूशनचा अनेक राज्यातील पोलिसांनी प्रभावी वापर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -