Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई धक्कादायक! मृतदेहावर तब्बल अडीच वर्षानंतर झाला अंत्यविधी!

धक्कादायक! मृतदेहावर तब्बल अडीच वर्षानंतर झाला अंत्यविधी!

Related Story

- Advertisement -

मुंबई येथील धारावी भागात राहणाऱ्या एका १७ वर्षाच्या मुलावर तब्बल अडीच वर्षांनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुलै २०१८ मध्ये या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्याचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता, यामुळे या मुलाचे कुटुंबीय पुन्हा त्याचं शवविच्छेदन व्हावं या मागणीवर ठाम होते. आता न्यायालयाने शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुंबईच्या जे.जे रूग्णालयाच्या शवगृहात मुलाचा मृतदेह तब्बल अडीच वर्षांहून ठेवण्यात आला होता. जोपर्यंत त्यांच्या मुलावर पुन्हा शवविच्छेदन करण्यात येणार नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे होते. या सर्व प्रकारानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. कुटुंबांच्या मागणीवरून न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत मुलाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. पुन्हा शवविच्छेदन केल्यानंतर मुलाचा मृतदेह त्याच्या कुटूंबाकडे सोपवण्यात येणार असून अखेर अडीच वर्षांनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

- Advertisement -

न्यायालयाने पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज बघिल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने जे.जे रुग्णालयाच्या डीनला पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी नवीन टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “जे जे हॉस्पिटलचे डीन पुन्हा शवविच्छेदनासाठी नवीन टीम तयार करण्यात येणार असून या टीममध्ये पहिल्यांदा शवविच्छेदनामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांचा सहभाग नसणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. तर ६ एप्रिलपूर्वी शवविच्छेदन करावे लागणार असून त्यानंतर रुग्णालयाने डीनच्या स्वाक्षर्‍यासह अहवाल सादर करावा लागणार आहे. ”

असा आहे प्रकार

कुटुंबियांच्या मते, जुलै २०१८ मध्ये मोबाइल चोरीच्या एका प्रकरणात या मुलाला पोलिसांनी पकडले होते. या प्रकरणात एफआयआर नोंदलेला नसतानाही पोलिसांनी त्यांच्या मुलाला जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. पोलीस कोठडीत त्या मुलाला पोलिसांकडून छळ आणि कठोर मारहाण करण्यात आली. घरातील सदस्यांनी त्याची सुटका व्हावी म्हणून कुटुंबीयांनी अनेकदा विनवणी केली. पोलिसांनी मुलाला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात दिले त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रूग्णालयातच काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या १७ वर्षीय मुलाचे नाव सचिन जैस्वार असे आहे. सर्वसामान्य परिस्थिती असल्याने सचिनचे वडील भाजी विकतात. त्यांना धारावीच्या पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध एफआयआर नोंदवायचा होता, मात्र या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये सचिनच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया असल्याचे सांगितले जात आहे. करण्यात आलेल्या या अहवालामुळे कुटुंबाचे समाधान झाले नसल्याने पुन्हा कुटुंबियांकडून शवविच्छेदनाची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -