प्रेमप्रकरणामुळे तरुणीला वडिलांनीच केली मारहाण

मुलीला घरात कोंडून ठेवून मानसिक व शारीरीक त्रास दिल्याप्रकरणी वडील काका व चूलत भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ladies police constable quarantined with boyfriend in nagpur
प्रेमप्रकरण

प्रेम प्रकरणास कुटूंबियांनी विरोध दर्शवित त्या तरूणीला घरात कोंडून मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडल आहे,. याप्रकरणावरून त्या तरूणीच्या कुटूंबियांविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील नामदेव पथ एकनाथ म्हात्रे नगर या परिसरात ही तरूणी राहते, या तरूणीचे एका तरूणासोबत प्रेमप्रकरण आहे. मात्र प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटूंबियांना मिळताच त्यांनी त्या तरूणीला घरात कोंडून मारहाण केली. अखेर त्या तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला घरात कोंडून ठेवून मानसिक व शारीरीक त्रास दिल्याप्रकरणी वडील काका व चूलत भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तर कल्याणमध्ये एनएमटीच्या बसचालक व वाहकाला मारहाण करण्यात आली आहे. इनोव्हा गाडीच्या चालकाला ओव्हरटेक करू न दिल्याचा रागातून वाहनचालकाने एनएमटीच्या बसचालकासह वाहकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार  कल्याणात घडला. बसचालक सुरेश वराळ आणि वाहक सुधीर काटकर हे जखमी झाले असून,  याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनएमएमटीची  बेलापूर रेल्वे स्थानक ते कल्याण ही बस संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास कल्याणात पोहचली. साडेसातच्या सुमारास ही बस कल्याण रेल्वे स्थानकाहून बेलापूर रेल्वे स्थानकाकडे परतीच्या प्रवासासाठी निघाली. कल्याण पत्रीपूल मार्ग चक्कीनाका हाजीमलंग रोडने जात असतानाच नमसकार धाबा बस स्टॉपकडे ही बस थांबली तेथून प्रवासी घेतल्यानंतर पुढे निघाली असतानाच पाठीमागून इनोव्हा गाडी भरधाव वेगाने आली. बसचालकाला ओव्हरटेक करू लागली. मात्र रस्ता अरूंद असल्योन बसचालक सुरेश वराळ यांनी ओव्हरटेक करून दिले नाही. त्यामुळे त्याचा राग त्या इनोव्हा चालकाला आला. त्याने आपली इनोव्हा त्या बसच्या पुढे नेऊन रस्ता अडवला व बस चालकाहस शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर इनोव्हातून तीनजण खाली उतरले त्यांनी रस्त्यावरील दगड बसच्या काचेवर भिरकावून काच फोडली. ती चाक चालकाच्या मांडीला लागली आहे. त्यानंतर तिघांनीही बसचालक व वाहक सुधीर काटकर यांना लाकडी दांडक्याने  मारहाण केली. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर तिघेही जण पळून गेले. जखमींना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. इनोव्हा गाडीचा नंबर घेण्यात आला असून तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या तिघांचाही शोध घेत आहेत.

तर कल्यामध्ये दुसरीकडे दारूच्या अड्ड्यावर पोलींसांनी छापे टाकले आहेत. बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येत असलेल्या हातभट्टीच्या दारू विरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असतानाच  टिळक नगर पोलिसांनी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथील दोन  घरात बेकायदेशीरपणे हात भट्टीची दारू विक्री होत असल्याचा ठिकाणी छापा टाकत  घरातून हात भट्टीची दारू जप्त करत दोन महिलांविरोधात  गुन्हा दाखल केला आहे .तसेच  सागाव परीसारतील हनुमान मंदिरा मागे शशिकांत पाचरणे हा इसम बेकायदेशीर हातभट्टीची दारू विक्री करत असताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच्याजवळील दारू जप्त केली आहे.