घरमुंबईमालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत

मालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत

Subscribe

मालाडच्या पिंपरीपाडा दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.

मालाडच्या पिंपरीपाडा दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. खासदार गजानन किर्तीकर, आमदार सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मालाड (पूर्व), पिंपरीपाडा येथील संरक्षक भिंत कोसळून दुर्घटनेतील जखमी आणि मदत व पुनर्वसनाबाबत माहिती दिली.

दुर्घटनेतील सुमारे ७० जणांवर उपचार सुरू आहेत. यातील गंभीर जखमींना आणखी आर्थिक मदतीची गरज लक्षात आहे हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ५० रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली. यावेळी खासदार किर्तीकर, आमदार प्रभू यांनी विविध विषयांसंदर्भात चर्चा करून, त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनही दिले. बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

काय आहे घटना 

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरात सोमवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळल्यामुळे २८ जण मृत्यूमुखी पडले असून ७० हून अधिक जण जखमी झाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून पाच लाखाची मदत दिली जाणार असून महापालिकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी. त्याचप्रमाणे याप्रकरणी चौकशी करून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर केली होती. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -