घरCORONA UPDATEPositive News: मुंबईतला कोरोना माघारी फिरतोय

Positive News: मुंबईतला कोरोना माघारी फिरतोय

Subscribe

कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचे लक्ष्य आता दृष्टीक्षेपात येत आहे सुरुवातीच्या काळात रुग्णांचे प्रमाण वाढून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. तसेच आता हा आजार नियंत्रणात येत असून कोरोना माघारी फिरत असल्याचे आकडेवारीवरू स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे आकडे सर्वच विभागांमध्ये दैनंदिन सरासरीच्या ५० टक्क्यांनी कमी झालेले पहायला मिळाले आहेत. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असली तरी दिवाळीच्या पुढील १५ दिवसांमध्ये हीच आकडेवारी कायम राहिल्यास खऱ्या अर्थाने कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याची खात्री पटेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईमध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेच्या २४ विभागांमध्ये एकूण बाधित रुग्णांची संख्या २ लाख ५७ हजार ९०१ एवढी झाली आहे. मागील आठवडयात ही संख्या २ लाख ५३ हजार ०३९ एवढी होती. त्यामुळे या आठवड्यात ४ हजार ८६२ एवढे रुग्ण आढळून आले आहे. तर मागील आठवड्यात हे प्रमाण ५ हजार ४७७ एवढे होते. त्यामुळे प्रत्येक आठवडयाला रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यापर्यंत ज्या भागांमध्ये सर्वांधिक रुग्ण आढळून येत होते, त्या भागांमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी दिसून येत आहे. कांदिवली आर/ दक्षिण विभागातत ८ नोव्हेंबरला रुग्णांचे प्रमाण ७१ एवढे होते, ते प्रमाण १४ नोव्हेंबरला ४७ एवढे झाले आहे. तर याच गोरेगाव पी /दक्षिण विभागात ५०वरून २३, वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम, मुलुंड ‘टी’ विभाग, नरिमन पॉईँट कुलाबा ‘ए’ विभाग, दहिसर आर /उत्तर विभाग, विलेपाले ते जोगेश्वरी पूर्व  या के/ पूर्व आदी विभागात रुग्ण दर कमी असून तो कायम आहे. तर बोरीवली आर/ मध्य विभागातही याच कालावधीत ८२ वरून हे प्रमाण ६८वर आले आहे. कुर्ला ‘एल’ विभागातही हे प्रमाण ४४ वरून २६वर आले आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी २५५ असला तरी भायखळा ‘ई ‘विभागात हे प्रमाण सर्वाधिक ४८२ एवढे आहे. तर त्याखालोखाल शिवडी,परळ या एफ /दक्षिण विभागात ४६६, चंदनवाडी,मरिनलाईन्स या ‘सी’ विभागात ४४४ आणि दादर माहिम धारावी या जी /उत्तर विभागात ४२८  दिवस एवढे आहे. तर पाच विभाग ३०० दिवसांच्या पुढे आहेत आणि १२ विभाग हे २०० दिवसांच्या पुढे आहे. म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी दिवसाच्या अर्थात २५५ दिवसांचे टार्गेट केवळ १० विभागांमध्ये पूर्ण झालेले नाही. परंतु रुग्ण दुप्पट होण्याचे कमी दिवस हे १७४ दिवस एवढे आहे आणि तो  विभाग कांदिवली आर/ दक्षिण आहे.

- Advertisement -

दोन विभाग ९० टक्के नियंत्रणात

मागील आठवड्यापासून दोन विभागांमध्ये रुग्णांचे प्रमाण हे सिंगल डिजिटवर असून ते आठवड्या अखेरपर्यंत कायमच होते. गिरगाव, चंदनवाडी, मरिनलाईन्स हा ‘सी’ विभाग आणि दुसरा आहे डोंगरी, उमरखाडी, सँडहस्टर्ड रोडचा ‘बी’ विभाग. या दोन्ही विभागांमध्ये आठवड्याच्या प्रारंभी अनुक्रमे  ४ आणि ७ असे रुग्ण होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही त्या विभागात अनुक्रमे प्रत्येकी ३ एवढेच रुग्ण होते. हे दोन्ही विभाग छोट्या क्षेत्रफळाचे असले तरी दाटीवाटीच्या लोकसंख्येचे असल्याने याठिकाणी कोरोना नियंत्रणात आणणे तेवढेच कठिण होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -