घरCORONA UPDATEकेईएममधील ‘तो’ व्हिडीओ कामबंद आंदोलन काळातला!

केईएममधील ‘तो’ व्हिडीओ कामबंद आंदोलन काळातला!

Subscribe

आंदोलनादरम्यान हा व्हिडीओ काढून प्रसारित करण्यात आला असून अशाप्रकारची कोणतीही परिस्थिती सध्या केईएम रुग्णालयात नाही.

केईएम रुग्णालयातील मंगळवारी स्ट्रेचर्सवर शव ठेवलेला व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आला होता. परंतु हा व्हिडीओ कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाच्यावेळीचा होता. आंदोलनादरम्यान हा व्हिडीओ काढून प्रसारित करण्यात आला असून अशाप्रकारची कोणतीही परिस्थिती सध्या केईएम रुग्णालयात नाही.

शीव रुग्णालय आणि त्यानंतर राजावाडी रुग्णालयात कोविडबाधित मृत व्यक्तींचे शव खाटांवर तासनतास पडून असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी केईएम रुग्णालयाच्या व्हरांड्यांमध्ये एकामागोमाग अशाप्रकारे स्ट्रेचर्सवर मृतदेह ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारचा व्हिडीओ प्रथम समाजमाध्यमावर आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रसारित केला होता. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने आपले स्पष्टीकरण देताना घटना मान्य करतानाच तो प्रकार कामबंद आंदोलनाच्या दरम्यानचा होता असे म्हटले आहे.

- Advertisement -

मंगळवारी केईएम रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांनी काही मुद्यांवरुन अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारले. तथापि, प्रशासनाच्‍या यशस्‍वी मध्‍यस्‍थीनंतर हे आंदोलन मागे घेण्‍यात आले. याच आंदोलन कालावधीदरम्‍यान रुग्‍णालयातील स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा संबंधित बाबींवर प्रतिकुल परिणाम होणे स्‍वाभाविक होते. मात्र, कामबंद आंदोलन मागे घेण्‍यात आल्‍यानंतर संबंधित कामगार व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्‍णालयातील स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा अधिक प्रभावीपणे करण्‍यात आली. तसेच त्‍यानंतर निर्धारित वैद्यकीय कार्यवाही क्रमानुसार स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा नियमितपणे करण्‍यात येत असल्याचे म्हटले आहे.

केईएम रुग्‍णालयात अचानक उद्भवलेल्‍या आंदोलनादरम्‍यानच्‍या कालावधीतील व्हिडिओ प्रसारि‍त झाल्यामुळे केवळ वैद्यकीय कामगार – वैद्यकीय कर्मचारी यांच्याच मनोबलावर नव्हे, तर रुग्‍णांच्‍या व त्यांच्या आप्‍तांच्‍या मनोबलावर देखील याचा मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी वस्‍तुस्थिती लक्षात घेऊन रुग्‍णालयातील हा व्हिडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारित करणे टाळावे. त्‍याचबरोबर प्रसारमाध्‍यमांनी व्हिडिओ चित्रण प्रसारित करणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -