घरCORONA UPDATECoronaVirus: कस्तुरबा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

CoronaVirus: कस्तुरबा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

Subscribe

मुंबईतील ज्या कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये हेल्थ केअरमधील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करुन त्यांना सुखरुप घरी सोडतात. त्याच कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंटचा पुरवठा होत‌ नसल्याची‌ तक्रार करत एवढं सर्व करुनही हॉस्पिटल प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईतील ज्या कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये हेल्थ केअरमधील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करुन त्यांना सुखरुप घरी सोडतात. त्याच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. कारण, त्या‌ कर्मचाऱ्यांनाच पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंटचा पुरवठा होत‌ नसल्याची‌ तक्रार करत एवढं सर्व करुनही हॉस्पिटल प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील परिचारिका-वॉर्डबॉय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंध किटऐवजी एचआयव्ही किटसोबत काम करावं लागत असल्याची धक्कादायक तक्रार करण्यात आली आहे.

कस्तुरबा हाॅस्पिटलमधील प्रत्येक हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनी सकारात्मक‌ बदल आणला. पण कोरोना विषाणू बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सेवा देणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगार-सफाईगार, कक्ष परिचर आणि परिचारिका यांना रुग्णालय प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रभाकर नारकर यांनी सांगितले. त्यांना पीपीई किट उपलब्ध होत नसल्यामुळे सेवा देणारे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षा धोक्यात आले आहे.

- Advertisement -

डॉक्टरांना कोरोना किट, (एन-९५) मास्क, चांगल्या प्रतीच्या हँडग्लोजचा पुरवठा केला गेला. पण, त्यांच्यासोबत काम करणारे सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कामगारांना, परिचारिकांना एचआयव्ही किट, हलक्या प्रतीचे मास्क आणि हँडग्लोज दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
– प्रदीप गोविंद नारकर, सेक्रेटरी, म्युनिसिपल मजदूर युनियन

संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, सुरक्षा रक्षक आदींची काळजी घेणे हॉस्पिटल प्रशासनाची जबाबदारी असल्याचे‌ नारकर म्हणाले. पण, ही वेळ तक्रारीची नसून लढण्याची असल्याने सर्व कर्मचारी एकसंघ होवून लढत असल्याचेही ते म्हणाले. एकत्रितपणे काम करून या कोरोना विषाणू विरोधातील लढाई यशस्वी करण्यासाठी सर्व संवर्गातील कामगारांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य किटचा पुरवठा करावयाचे निवेदन मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना देण्यात‌ आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: डॅशिंग अधिकारी अश्विनी भिडेंवर कोरोना वॉर रुमची जबाबदारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -