घरमुंबईगृहमंत्र्यांनी विनयभंगाच्या व्याख्येचा अभ्यास करावा; सुषमा अंधारेंचा टोला

गृहमंत्र्यांनी विनयभंगाच्या व्याख्येचा अभ्यास करावा; सुषमा अंधारेंचा टोला

Subscribe

बाजूला व्हा असे म्हणणे विनयभंग असेल, तर अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे लागतील

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकणी आव्हाडांना जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला. हे सर्व आधीपासून ठरलं होतं असा आरोप यावेळी आव्हाडांनी केला. यावरूनच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushama andhare) यांनी एक व्हिडीओ ट्विट करून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

“भारतीय संविधानात ९९ दोषी सुटले तरी चालतील, पण एक निरपराध असेल तर त्याला शिक्षा होऊ नये असं म्हटलं आहे. तरी ज्या पद्धतीने संजय राऊतांना अटक झाली आणि न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की ही अटकच बेकायदेशीर होती. त्याच पद्धतीने तोच प्रयत्न आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad)यांच्या बाबतीत होत आहे. विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री आणि सगळ्याच भाजपा नेत्यांनी अभ्यासण्याची गरज आहे”, असं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या “बाजूला व्हा असे म्हणणे विनयभंग असेल, तर अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे लागतील? पण आम्ही असं म्हटलं तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule)म्हणतात की जे लोक समर्थन करतायत, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू. मग चंद्रशेखरदादा, तुम्ही ना गृहमंत्री आहात, ना तुम्ही कोणत्या न्यायालयीन पदावर आहात. मग तुम्ही असा फतवा कसा काढू शकता?”, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला आहे.

- Advertisement -

“जर खरंच आपल्याला वाटत असेल की समर्थन करणाऱ्यांनाही तुम्ही अटक कराल, तर कायद्याची अभ्यासक म्हणून सांगते, आम्ही जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देत आहोत. तुम्हाला अटक करायची असेल, तर तुम्ही बिनधास्त अटक करू शकता. संपूर्ण महाराष्ट्राला एकदा कळू द्या की तुमची मनमानी आणि सूडबुद्धीचे राजकारण कोणत्या पातळीवर जात आहे”, असंही अंधारे व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाल्या. एकूणच या सगळ्या प्रकरणी राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.


हे ही वाचा –  प्रतापगडावर लाइट शोद्वारे ‘त्या’ घटनेचे सादरीकरण; पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -