घरक्राइमपतीला पाठवले दारू आणायला अन् दोघांनी साधला डाव; डोंबिवलीत महिलेवर सामूहिक अत्याचार

पतीला पाठवले दारू आणायला अन् दोघांनी साधला डाव; डोंबिवलीत महिलेवर सामूहिक अत्याचार

Subscribe

डोंबिवली पूर्व भागात पीडित दाम्पत्य राहते. ते काही दिवसांपासून घर सोडण्याच्या तयारी होते. या जोडप्याने आपले घरगुती सामान त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते.

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागात महिला असुरक्षित असल्याची आणखी एक घटना डोंबिवलीमध्ये घडली. एका महिलेवर दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला असून, यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र, डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी दोघांपैकी एक आरोपी दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर दिनेशचा साथीदार सुनिल राठोड याचा शोध पोलीस घेत आहेत.(The husband was sent to bring liquor and the two made a plan Gang rape of woman in Dombivli)

डोंबिवली पूर्व भागात पीडित दाम्पत्य राहते. ते काही दिवसांपासून घर सोडण्याच्या तयारी होते. या जोडप्याने आपले घरगुती सामान त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी पीडित महिला आणि तिचा पती हे त्यांचे सामान आणण्यासाठी गेले होते. या दोघांच्या ओळखीचे दिनेश गडारी आणि सुनिल राठोड हे दोघे घरी होते. या दोघांनी पीडित महिलेच्या पतीला दारु आणण्याकरता सांगितले. तिचा पती दारू आणण्यासाठी निघून गेला. पीडिता एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर अत्याचार केला.

- Advertisement -

पाठलाग करून रिक्षातही केला अत्याचार

घडलेल्या घटनेनंतर पीडिता कशीबशी घराबाहेर निघाली आणि पळू लागली. तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रिक्षात कोंबले आणि तिच्यावर तिथेही अत्याचार केला. पीडित महिला मदतीची याचना करत होती. मात्र डोंबिवलीतील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली.

पतीलाही ठेवले होते डांबून

घटनेच्या काही वेळानंतर पीडित महिलेचा पती दारू घेऊन मित्राच्या घरी परतला तेव्हा तिने पतीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. आरोपींनी पतीसमोरच पीडितेसोबत अश्लील चाळे केले. पीडित महिलेच्या पतीला मारहाण करत त्याला देखील एका घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. ही घटना झाल्याच्या नंतर आरोपींनी या दोघांना पोलीस स्टेशनला किंवा कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देत तिथून पिटाळून लावले.

- Advertisement -

हेही वाचा : शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षेत मुंबईचा क्रमांक चिंताजनक; तुमचे शहर कोणत्या क्रमांकावर?

एक अटकेत दुसरा फरार

विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल राठोड अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : ASIAN GAMES 2023 : अखेरच्या क्षणी सुनील छेत्रीने केला गोल; भारताने एशियन गेम्समध्ये उघडले खाते

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ

मागील एक ते दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षेच्या प्रश्नासह कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केल्या जात आहे. याचदरम्यान आज संसदेत मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. एकंदरीत या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटानांचा आढावा घेतला असता मागील आठ महिन्यांत 549 लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांत करण्यात आली आहे. तर 300 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचीही नोंद आहे.तसेच कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -