घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे गुरूवारी उद्घाटन

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे गुरूवारी उद्घाटन

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राचे उद्घाटन होत असल्याने येथील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन होणार आहे. गुरुवारी, ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षापासून इंजीनिअरिंग कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. कल्याण उपकेंद्रामुळे कल्याण व परिसरातील शहापूर, मुरबाड तालुके आणि कर्जत-कसारा पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुंबईला न जाताही मुंबई विद्यापीठातील शिक्षण घेता येणार आहे.

तांत्रिक अडचणी आणि परवानग्यांमुळे विलंब

राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या काळात कल्याण उपकेंद्राला मंजूरी देण्यात आली. त्यासाठी महापालिकेने बगीच्यासाठी आरक्षित असलेला गांधारी येथील भूखंडाचे आरक्षण बदलून २०१० साली शैक्षणिक उपक्रमासाठी विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात आला. २०१० मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री राजेश टोपे आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू चंद्रा अय्यंगार यांच्या उपस्थितीत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. मात्र २०१३ साली उपकेंद्राच्या इमारतीचे काम सुरु झाले व ते २०१६ साली इमारत बांधून पूर्ण झाली. मात्र काही तांत्रिक तसेच परवानग्यांचे कारणांमुळे उपकेंद्र सुरु होण्यात विलंब झाला.

- Advertisement -

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

या वर्षीही मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून कल्याणचे उपकेंद्र सुरु करण्याच्या हालचाली दिसत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक रमेश जाधव आणि राजेंद्र देवळेकर यांनी येत्या महासभेत उपकेंद्राचा भूखंड परत घेण्याचा प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला. त्यामुळे धावपळ करीत विद्यापीठ प्रशासनाने कल्याण उपकेंद्रातून या शैक्षणिक वर्षापासून स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड अप्लाईड सायन्सेसचे अभ्यासक्रम सुरु करीत असल्याचे जाहीर केले. अखेर उपकेंद्रांच्या उद्घाटनाला गुरूवारी मुहूर्त मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाच्या वर्षी हे कोर्स होणार सुरू

कल्याण उपकेंद्रातील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अॅण्ड अप्लाईड सायन्सेसच्या इमारतीमधून एम.टेक इन केमिकल इंजीनिअरिग अॅण्ड टेक्नॉलॉजी, एम.टेक इन कॉम्प्यूटर इंजीनिअरिंग, एम.टेक इन ट्रान्स्पोर्टेशन इंजिनिअरिंग, एम.टेक इन आर्टिफिशीअल इंटेलीजन्स अॅण्ड मशीन लर्निंग, मास्टर इन सायन्स इन ओशोनोग्राफी, पी. एचडी इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, पी. एचडी इन केमिकल इंजीनिअरिग अॅण्ड टेक्नॉलॉजी इत्यादी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -